महाबुलेटीन कोरोना अपडेट : खेड तालुका ( दि. ४ नोव्हेंबर २०२० ) खेड तालुक्यामध्ये चार दिवसांत कोरोनाचा चढता आलेख…१४, १६, २८, ५२
कोरोना रुग्णांची होतेय झपाट्याने वाढ, नव्याने ५२ कोरोना बाधित रुग्ण आढळले, चाकण हॉट स्पॉटवर सर्वाधिक २३, तर ग्रामीण भागात २३ रुग्ण आढळले…
तालुक्यात कोरोना मृत्यूने २०० चा टप्पा ओलांडला, २०३ जणांचा मृत्यू, नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन…
महाबुलेटीन न्युज नेटवर्क : प्रतिनिधी
राजगुरूनगर : खेड तालुक्यात सोमवार ( दि. ४ ) चोवीस तासात कोरोनाचे ५२ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यात राजगुरुनगर, चाकण, आणि आळंदी शहर हद्दीत २९ तर ग्रामीण भागात २३ रुग्णांचा समावेश आहे. काल मंगळवारी तालुक्यात २८ रुग्ण आढळले, तर आज जवळपास दुपटीने वाढ होऊन ५२ रुग्ण आढळले.
आतापर्यंत तालुक्यात एकूण ९३६० जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यातील ८९८८ रुग्ण बरे झाले असून १६९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज २१ रुग्णांवर उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण २०३ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर व आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली. नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
राजगुरूनगर नगरपरिषद हद्दीत २, चाकण नगरपरिषद हद्दीत २३, आळंदी नगरपरिषद हद्दीत ४, तर ग्रामीण भागात मेदनकरवाडी ५, दावडी ४, चिंबळी, गुंडाळवाडी, कनेरसर मध्ये प्रत्येकी २, आणि कडुस, कडाचीवाडी, कुरुळी, म्हाळुंगे इंगळे, नाणेकरवाडी, राक्षेवाडी, वाडा व गाडकवाडी या ८ गावात प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे.
—
माननीय संपादक साहेब,
नमस्कार,
प्रथमतः आपली हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ, खेड तालुका *अध्यक्ष पदी* बिनविरोध निवड झाल्याबद्दल आपले दुर्गाई हृदय प्रतिष्ठान व मित्र परिवार व मामा शिंदे परिवाराच्या वतीने मनापासून खूप खूप हार्दिक अभिनंदन!
आपल्या महा बुलेटीन च्या बातम्या आवर्जून रोजच्या रोज आम्ही वाचतो. आपण कोरोना रूग्णांचे अपडेट, आकडेवारीनुसार बिनचूक रोजच्यारोज देत आहात. तसेच खेड तालुक्यातील सामाजिक, राजकीय, अध्यात्मिक व निधन वार्ता इत्यादीबद्दलच्या बातम्यांमुळे आम्हाला खेड तालुक्यातील घडामोडी रोजच्यारोज समजतात. तसेच आपण आमच्याही सामाजिक कार्याची दखल घेऊन वेळोवेळी बातम्या देत आले आहात त्या बद्दल आपले मनापासून खूप खूप शतशः आभार!
आपण बऱ्याच वर्षांपासून एक आदर्श पत्रकार म्हणून कार्यरत आहात. आताही आपण संपादक म्हणून अल्पावधीतच *महा बुलेटीन* न्यूजद्वारे या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून समाजापुढे एक आदर्श निर्माण करीत आहात. आपल्या पुढील वाटचालीस मनापासून खूप खूप हार्दिक शुभेच्छा !
आपले शुभचिंतक,
मामा शिंदे व परिवार चाकण,
दुर्गाई हृदय प्रतिष्ठान व मित्र परिवार.