Friday, April 18, 2025
Latest:
उद्योग विश्वखेडपिंपरी चिचंवडपुणे जिल्हाप्रादेशिकविधायकविशेष

लॉरियाल कंपनी व कामगारांकडून पी एम केअर फंडासाठी पावणेतीन लाख, तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १ लाख ३७ हजाराचा धनादेश प्रदान

लॉरियाल कंपनी व कामगारांकडून पी एम केअर फंडासाठी पावणेतीन लाख, तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १ लाख ३७ हजाराचा धनादेश प्रदान

महाबुलेटीन न्यूज 
चाकण एमआयडीसी : कोव्हिड १९ या महामारीच्या काळात आपण समाजाचे काही तरी देणे लागतो या समाजभावनेतुन लाॕरियाल कंपनीतील २७४ कामगारांनी प्रत्येकी १०००/- गोळा करून एकुण २,७४,०००/-जमा झाले. त्यातील १,३७,०००/- पी.एम.केअर फंडासाठी पगारातुन कट करुन देण्यात आले. तर तेवढेच पैसे कंपनीनेही पी.एम.केअर फंडासाठी दिले व उरलेले १,३७,०००/- मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी धनादेशद्वारे देण्यात आले.

यावेळी लाॕरियाल कामगार संघटनेचे अविनाश वाडेकर, किशोर दाभाडे, रेश्मा हांडे, गणेश बोचरे, रवि साबळे, सागर ठाकुर, अमित तुपे, मुकुंद महाळुंकर, पोपट बोत्रे, मनोज कंद व सांगिता गायकवाड यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी सामाजिक कार्यात केलेल्या मदतीसाठी आपल्या सर्व कामगारांचे व व्यवस्थापनाचे संघटनेचे अध्यक्ष श्री. अविनाश वाडेकर यांनी आभार मानले.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!