क्रांतिकारकाच्या ऋणातून उतराई होण्याची संधी; अरुण लाड यांना निवडून द्या : आमदार दिलीप मोहिते
महाविकास आघाडीचा राजगुरूनगर येथे प्रचार मेळावा
महाबुलेटीन न्यूज : प्रभाकर जाधव
राजगुरूनगर : पुणे विभाग पदवीधर मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण गणपती लाड यांच्या पाठीशी खेड तालुक्यातील सर्व आघाडी पक्षांची ताकद उभी करून त्यांना विजय प्राप्त होण्यासाठी कसून प्रयत्न करा, असे आवाहन खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी येथे केले. पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.
आमदार दिलीप मोहिते म्हणाले की, यापूर्वी भाजपकडे संघटन कौशल्य असल्यामुळे अनेक वर्ष प्रकाश जावडेकर आणि नंतर चंद्रकांत पाटील हे या ठिकाणी आमदार म्हणून कार्यरत
होते. आता बऱ्याच वर्षानंतर महाविकास आघाडीच्या माध्यमातून अरुण आण्णा लाड हे आपले उमेदवार म्हणून निवडून देण्याची संधी आपल्याला प्राप्त झाली आहे. यावेळी मतदार मर्यादित असून सुशिक्षित असल्यामुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस (आय), शिवसेना असे तीन पक्ष संघटित होऊन प्रामाणिकपणे काम केले तर आपला उमेदवार सहजासहजी निवडून येईल अशी खात्री आहे.
अरुण लाड हे एका क्रांतिकारकाचा मुलगा असून या देशाच्या स्वातंत्र्यासाठी महाराष्ट्र चळवळीमध्ये स्वतःला झोकून देऊन ज्यांनी काम केले: त्यांच्या ऋणांतून उतराई होण्याची संधी आपणाला या निमित्ताने मिळाली आहे.
यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील, खरेदी – विक्री संघाचे अध्यक्ष राजाराम लोखंडे, काँग्रेस आय चे विजय डोळस, शिवसेनचे मा. तालुकाप्रमुख गणेश सांडभोर, खेड तालुका
राष्ट्रवादीचे अध्यक्ष कैलास सांडभोर, हिरामण सातकर,
अनिलबाबा राक्षे, अरुण चांभारे, अरुण चौधरी, पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी उपाध्यक्ष कांचनताई ढमाले, खेड तालुका
राष्ट्रवादीचे महिला अध्यक्षा संध्याताई जाधव,
मनीषाताई टाकळकर, सुजाताताई पचपिंड, वैभव नाईकरे, ऍड. अरुण मुळूक, ऍड. सुखदेव पानसरे, प्रताप ढमाले,
सुभाष होले, उमेश गाडे, कैलास लिंभोरे, सुरेश शिंदे, नवनाथ
होले, विक्रम भोर, बी. के. कदम, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस (आय) व शिवसेना पक्षाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.