Thursday, April 17, 2025
Latest:
गुन्हेगारीपिंपरी चिचंवडपुणे जिल्हाप्रादेशिकमहाराष्ट्रमावळविशेष

किशोर आवारे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अटकेत, वडिलांचा ‘त्या’ अपमानाचा खून करत घेतला बदला, माजी नगरसेवकाच्या मुलाने रचला आवारेंच्या हत्येचा कट

किशोर आवारे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अटकेत,
वडिलांचात्याअपमानाचा खून करत घेतला बदला, माजी नगरसेवकाच्या मुलाने रचला आवारेंच्या हत्येचा कट

महाबुलेटीन न्यूज

तळेगाव दाभाडे, दि १४ : जनसेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्याकांडामुळे संपूर्ण मावळ तालुका हादरून गेला आहे. मात्र, पोलिसांनी सूत्र हलवत या हत्येच्या मुख्य आरोपीला अटक केली आहे. माजी नगरसेवक भानू खळदे यांचा मुलगा गौरव खळदे यानेआवारे यांनी त्याच्या वडिलांना कानशिलात लगावल्याच्या रागातून हत्या केल्याचे  स्पष्ट झाले आहे. ( Kishor Aware Murder Case )

किशोर आवारे यांच्यावर तळेगाव नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर शुक्रवारी ( दि. १२ ) प्राणघातक हल्ला झाला होता. या हल्ल्यात किशोर आवारे गंभीर जखमी झाले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्यांना तात्काळ सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती.

या घटनेतील प्रमुख आरोपी गौरव खळदे हा माजी नगरसेवक भानू खळदे यांचा मुलगा आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांचे वडील आणि किशोर आवारे यांच्यामध्ये काही कारणावरून वाद झाले होते. त्यात किशोर आवारे यांनी खळदे यांना मारहाण केली होती. त्याचाच रागमनात ठेवून भानू खळदे यांचा मुलगा गौरवने बदला घेण्याचं ठरवले. त्यानुसार नगरपरिषद कार्यालयाच्या समोर भर वर्दळीच्या ठिकाणी किशोर आवारे यांची क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली.

या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची कसून चौकशी केली, तेव्हा त्यांनी गौरव खळदेच्या सांगण्यावरून हत्या केल्याची कबुली दिली, अशी माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्याने काही तासांतच मुख्य आरोपी पोलिसांना सापडला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मावळ तालुक्यात या घटनेने तणावाचे वातावरण पसरले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी गौरव भानू खळदे याच्या अगोदर शाम अरुण निगडकर, प्रवीण संभाजी धोत्रे, आदेश विठ्ठल धोत्रे, संदीप उर्फनन्या विठ्ठल मोरे, श्रीनिवास उर्फ सिनु व्यंकटस्वामी शिडगळ यांना अटक केली होती. न्यायालयाने आरोपींना २० मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!