खेडच्या तहसीलदार सुचित्रा आमले यांची अखेर बदली, खेड तहसीलदारपदी वैशाली वाघमारे यांची नियुक्ती..
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
राजगुरूनगर : खेडच्या तहसीलदार श्रीमती सुचित्रा आमले यांची अखेर बदली झाली असून त्यांची नियुक्ती तहसीलदार तथा अन्नधान्य वितरण अधिकारी ( नियतन ) पुणे या रिक्त पदावर करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी पंढरपूरच्या तहसीलदार श्रीमती वैशाली वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
श्रीमती वाघामारे यांनी आपल्या पदावर तात्काळ रुजू होण्याचे व श्रीमती आमले यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश महसूल व वन विभागाचे उपसचिव डॉ. माधव वीर यांनी आज दि. १८ डिसेंबर २०२० रोजी दिले आहेत.
तसेच भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी दि. २७ ऑक्टोबर २०२० च्या पत्रान्वये निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव, सामान्य प्रशासन विभाग यांनी दिलेल्या सहमतीने सदर आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
—