खेड तालुक्यातील ८० ग्रामपंचायतींवर अखेर प्रशासकांची नियुक्ती
पहा आपल्या गावात कोण प्रशासक
महाबुलेटिन न्यूज नेटवर्क : प्रतिनिधी
राजगुरूनगर : खेड तालुक्यातील २१ आणि २३ ऑगस्ट रोजी मुदत संपलेल्या ८० ग्रामपंचायतींवर पंचायत समितीतील विस्तार अधिकाऱ्यांची अखेर प्रशासकीय पदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ह्या नियुक्त्या केल्या आहेत. प्रशासकपदी नेमणूक झालेल्या व्यक्तीस महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहिता २०११ मधील तरतुदीनुसार सरपंच पदाचे अधिकार व कर्तव्ये प्राप्त होणार आहेत.
खेड तालुक्यातील ८० ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या विस्तार अधिकाऱ्यांची नावे व त्यांना दिलेल्या ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे :-
१. बाळासाहेब ओव्हाळ :- कोरेगाव बुद्रुक, तळवडे, गोनवडी, कुरकुंडी, किवळे, चांदुस, चिंबळी, शेलु, पिंपरी बुद्रुक, आसखेड खु., वाजवणे,
२. एस. एन. महंकाळे :- साबुर्डी, दोंदे, रानमळा, वडगाव पाटोळे, वेताळे,
३. एस. डी. थोरात :- मेदनकरवाडी, शिंदे, सांगुर्डी, करंजविहीरे, शिवे, वासुली, सावरदरी, वराळे, महाळुंगे इंगळे, कान्हेवाडी तर्फे चाकण, अहिरे, हेद्रूज, गडद, पाळू,
४. एस. बी. कारंडे :- खराबवाडी, कुरुळी, चिंचोशी, निमगाव, जऊळके बुद्रुक, खरपुडी बुद्रुक, वाकी खुर्द, चांडोली, कनेरसर, पाडळी, पांगरी,
५. जी. पी. शिंदे :- मोई, कोयाळी तर्फे चाकण, मरकळ, चऱ्होली खुर्द, वाफगाव, गोलेगाव, रासे, धानोरे, केळगाव, खरपुडी खुर्द, विर्हाम, औदर,
६. ए. एन. मुल्ला :- दावडी, रेटवडी, नाणेकरवाडी, भोसे,
७. जीवन कोकणे :- वाकळवाडी, गोसासी, काळुस, कमान, खरोशी, टोकावडे, भोरगिरी, कान्हेवाडी बुद्रुक, चिंचबाईवाडी, पुर, तुकईवाडी, मोहकल,
८. बाळकृष्ण कळमकर :- कुडे खुर्द, कळमोडी, आंबोली, घोटवडी, टाकळकरवाडी, वरची भांबुरवाडी, कुडे बुद्रुक, येणिये बु., तोरणे बु., वांद्रा, औंढे,
सदर नियुक्ती ज्या दिवशी विधिग्राह्य गठीत झालेली ग्रामपंचायत अस्तित्वात येईल त्या दिवसापासून प्रशासकपद व प्रशासकाचेअधिकार संपुष्टात येणार आहेत. प्रशासक व्यक्तीकडून आपली कर्तव्ये पार पाडताना झालेल्या गैरवर्तुणीकीबद्दल किंवा कोणत्याही लांच्छनास्पद वर्तणूक अथवा कर्तव्यात दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास आल्यास सदर व्यक्तीस पदावरून दूर करण्याचा अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आहे.