खेड तालुक्यात तब्बल साडे चार महिन्यानंतर प्रथमच कोरोना रुग्णांची फिफ्टी…● तालुक्यात आज ५० रुग्ण आढळल्याने प्रशासनाची चिंता वाढली…
महाबुलेटीन न्यूज
राजगुरूनगर : दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांची वाढ होत असून तब्बल साडे चार महिन्यानंतर खेड तालुक्यात ५० कोरोना रुग्ण वाढल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
यापूर्वी ११ ऑक्टोबरला ५४ रुग्ण आढळले होते. मागील महिन्यापासून तालुक्यात सरासरी २० रुग्ण मिळून येत आहेत. आज खेड तालुक्यात अचानक ५० रुग्ण वाढल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. कुरुळी गावात आज ११ रुग्ण आढळले आहेत.
कोरोनाच्या काळात सहा महिन्यात तालुक्यात एकूण २०६ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या मृत्युदर स्थिर असला तरी नागरिकांनी काळजी घेण्याची आवाहन प्रशासनाने केले आहे.
———-
*आपल्या परिसरातील ताज्या घडामोडींसाठी आजच ‘महाबुलेटीन’ च्या वेबसाईट वरील 🔔 बेल आयकॉन क्लिक करून सबस्क्राईब करा…*
https://mahabulletin.com
————————————————-
*आपल्या परिसरातील ताज्या बातम्या जलद वाचण्यासाठी फॉलोव करा महाबुलेटिनला टेलिग्रामवर…*
https://t.me/Mahabulletin
———————————————–
*आपल्या परिसरातील ताज्या घडामोडींसाठी आजच लाईक करा ‘महाबुलेटिन’चे फेसबुक पेज…*
https://www.facebook.com/MahaBulletinNews
————————————————