मला सुरेश भाऊंच स्मरण होतंय म्हणून मी खेडला आलोय, पुढील निवडणुकीत खेड तालुक्यात भगवा फडकणार म्हणजे फडकणार..: खासदार संजय राऊत ● आमचा शिवसैनिक तीन महिने तुरुंगात, चुकीचे कागद बनविणाऱ्या अधिकाऱ्यांना सोडणार नाही : खासदार राऊत ● खेड तालुक्यात शिवसेनेचा मेळावा संपन्न ● फक्त तोंडाने शिवसेना बोलू नका, कानाखाली जाळ काढा : रवींद्र मिर्लेकर ● आज खेड तालुका बिहार पेक्षाही बेकार : शिवाजीराव आढळराव
मला सुरेश भाऊंच स्मरण होतंय म्हणून मी खेडला आलोय, पुढील निवडणुकीत खेड तालुक्यात भगवा फडकणार म्हणजे फडकणार..: खासदार संजय राऊत
● आमचा शिवसैनिक तीन महिने तुरुंगात, चुकीचे कागद बनविणाऱ्या अधिकाऱ्यांना सोडणार नाही : खासदार राऊत
● खेड तालुक्यात शिवसेनेचा मेळावा संपन्न
● फक्त तोंडाने शिवसेना बोलू नका, कानाखाली जाळ काढा : रवींद्र मिर्लेकर
● आज खेड तालुका बिहार पेक्षाही बेकार : शिवाजीराव आढळराव
महाबुलेटीन न्यूज
खेड-आळंदी ( पुणे ) : “गद्दारी कुठे कुठे झाली हे अजिबात विसरू नका. शिवसेनेचा उमेदवार पाडण्यासाठी भाजपने इथेही गद्दारी केली आणि आमचा उमेदवार पाडला. म्हणून आम्ही राज्यातले भाजपचे सरकारच पाडले. मी पुन्हा सांगतो इकडची दुनिया तिकडे होईल पण खेडचा आमदार आता शिवसेनेचाच होईल.” असा सूचक इशारा शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी दिला.
आज खेड तालुका शिवसेना भव्य मेळावा शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत व राज्य समन्वय रवींद्र मिर्लेकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला, यावेळी ते बोलत होते. थोडी शिस्त आणली तर दिलीप मोहिते घरीच…! प्रत्येक दिवसाचा हिशोब दिला जाईल अशा कडक शब्दात खासदार संजय राऊत यांनी आमदार मोहिते यांच्यावर तोफ डागली..
सरकार असण्या नसल्याचा काही आम्हाला फरक पडत नाही. पण इतर पक्षाचा राजकारण आत्मा आहे. खेडचे राजकारण अतिशय गलिच्छ झाले आहे. पण या आमदार महाशयांचे नाव काढले की त्यांच्या पक्षाचे आमदार हसतात..
एक शिवसैनिक तीन महिने आतमध्ये आहे. या वेदना आम्हाला आहेत तो व्यक्ती जागेवरच नव्हता तरी तो आत आहे. पण तो अजूनही जिद्द हरला नाही. पण शिवसेनेचा मंत्र आहे गद्दाराणा थारा नाही. तुम्ही हेही लक्षात असुद्या आम्ही उचलून पण नेऊ शकतो. पण आम्ही कुणाच्या नादाला लागत नाही. आपले मुख्यमंत्री देशातील प्रथम क्रमांकाचे मुख्यमंत्री ठरले, पहिले ठरले की नाही? राजकारणात संयम ठेवला पाहिजे. शिवसेना धनदांडग्याचा पक्ष नाही.
मी खेड मध्ये आलोय, मला सुरेश भाऊंच स्मरण होतंय, आपलं वाघाच काळीज आहे. आणि आपण वाघाची अवलाद आहे आम्ही अंगावर जाणार ते पण सामोरा समोर..मी सर्वांशी बोललो आहे गृहमंत्री, मुख्यमंत्री पण कागद चुकीचे केले आहेत. पण आम्ही ते अधिकारी असतील किंवा कुणीही कुणाला सोडणार नाही.
शिवसेना पक्ष ब्रँड आहे ते देशात कुणाला सांगायला नको. बाळासाहेब म्हणायचे बाबरी तोडणारे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे. बाळासाहेबांनी परिणामाची परवा कधी केली नाही. बाळासाहेबांनी जात,पात, धर्म कधी पाहिला नाही.
बाळासाहेब नसते तर हा महाराष्ट्र फुटला असता, फाटला असता, मुंबई विकली गेली असती. त्यामुळे शिवसेनेच्या वाटेला जाऊ नका. ही माझी दुसरी वेळ आहे पण आमचे शिवसैनिक आतमध्ये सडवले जात असतील तर, हे सहन केले जाणार नाही. संघटना बळकट करा, समोर कोण आहे याची परवा करू नका. तुम्ही शिट्टी मारा आम्ही सदैव हजर आहोत. आमच्या देशाचे आणि सरकारचे मार्गदर्शक शरद पवार आहेत. पण खेड मधील किडे वळवळ करतात त्यांचा बंदोबस्त करा याना पक्ष नसतो त्यांची विकृती असते. त्यांच्या डोक्यात विष आहे कचरा आहे तो काढला जाईलच. शांत ऐकून घेऊ नका उद्याच्या प्रत्येक निवडणुकीत म्हणजे ग्रामपंचायत ते विधानसभा पर्यंत फक्त आपल्याला भगवा फडकवायचा आहे.
माझ्या मागे आता बैलगाडा लागला आहे. कुठे पण असुद्यात बैलगाडा मागे आहेच. चाकणला ऑटोमोबाईल कंपन्या खूप आहेत आता बैलगाडा वाढवा..यासाठी जनआंदोलन उभारा..हेही सांगतो हे फक्त आपणच करू शकतो. पुढच्या मोसमात बैलगाडा पाहिजे. काय? बैल पण आपलेच आहेत ते आपले ऐकतातच? हा पवित्र विषय आहे हा शेतकऱ्यांच्या श्रद्धेचा विषय आहे. यापुढे हा विषय कोणते सरकार नाही तर जण आंदोलन सोडवेल हे लक्षात असुद्या..
PMRD चे चुकीचे आरक्षण पडतात याच्या मागे कोणता व्यवहार आहे हे मला मंत्र्यांशी बोलावं लागेल. त्या कमिटीत मी आहे. खासदार श्रीरंग बारणे आहेत बघू नक्की तोही विषय मार्गी लावूत. मी शेवटी पुन्हा सांगतो खेड तालुक्यात भगवा फडकणार म्हणजे फडकणार..
आजच्या मेळाव्यात माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर सडकडून टिका केली. अरे तुझा जीव केवढा आणि काय मला दाखवणार हे योग्य आहे का? आज खेड तालुका अक्षरशः बिहार पेक्षाही बेकार झाले आहे. अशा भाषेत त्यांनी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर टिका केली. पण तुम्ही येणाऱ्या निवडणुकाच्या माध्यमातून यांना यांची मुजोरी दाखवून द्या. मग ते अधिकारी असतील त्यांना पण धडा शिकवण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही. असा निर्वाणीचा इशारा माजी खासदार आढळराव पाटील यांनी बोलताना दिला.
● PMRD च्या आरक्षणाचा मोठा मुद्दा उपस्थित झाला आहे त्यासाठी आम्ही मागील काही दिवसांपूर्वी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून कल्पना दिली आहे. त्यात प्रशासनाने आम्हांला विश्वासात घ्यायला हवे होते.
अजून एक सर्वांच्या जिव्हाळ्याचा मुद्दा समोर आला आहे. तो म्हणजे बैलगाडा शर्यतसाठी कुणी फ्लेक्स लावतय आणि आम्ही शर्यत सुरू करू पण ती शर्यत फक्त आणि फक्त शिवसेनाच आणि शिवाजी आढळराव पाटील सुरू करू शकतात. कर्नाटकातही माझ्या २०११ च्या कोर्टाच्या निर्णयाने बैलगाडा शैर्यत सुरू झाली आहे. पण त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवे. हे तर आपण करणारच आहे पण तालुक्यातील पक्षही वाढायला हवा, त्यासाठी आपल्याला शिवसेनेचे नेते संजयजी राऊत आणि राज्य समन्वय रवींद्र मिर्लेकर मार्गदर्शन करणारच आहेत.
यावेळी रवींद्र मिर्लेकर म्हणाले, “मला २००४ ची लोकसभा निवडणूक आठवते, त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांची घणाघाती सभा झाली आणि आपले उमेदवार ३० हजार मताच्या फरकाने विजयी झाले. पण आता ती शिवसेना कुठे आहे, ती जनता कुठे आहे? आताची जी शिवसेना बघितली तर खूप वेदना होतात. मी संपूर्ण खेड तालुका फिरलो आहे. आजच्या पंचायत समितीच्या प्रकरणावर मी बोलणार नाही. तुम्ही फक्त तोंडाने शिवसेना बोलू नका, कानाखाली जाळ काढा”, अशा भाषेत राज्य समन्वय रवींद्र मिर्लेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर तोफ डागली.
यावेळी शिवसेनेचे खासदार राष्ट्रीय प्रवक्ते संजय राऊत, रविंद्र मिर्लेकर, माजी आमदार शरद सोनवणे, जिल्हाप्रमुख माऊली कटके, जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, उपजिल्हा प्रमुख शिवाजी वर्पे, माजी उपजिल्हा प्रमुख अशोक खांडेभराड, तालुका प्रमुख रामदास धनवटे, नितीन गोरे, माजी तालुका प्रमुख प्रकाश वाडेकर, माजी तालुका प्रमुख सुरेश चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य किरणशेठ मांजरे, महिला आघाडी जिल्हा संघटिका विजयाताई शिंदे, माजी उपसभापती ज्योतीताई अरगडे, महिला आघाडी तालुका प्रमुख नंदाताई कड, उपतालुका प्रमुख किरण गवारे, युवा तालुका प्रमुख विशाल पोतले माजी शहर प्रमुख पांडुरंग गोरे, ग्राहक सेना जिल्हा उपप्रमुख लक्ष्मण जाधव, विजय शिंदे, चाकण शहर प्रमुख महेश शेवकरी, विश्वास नेहेरे आदी मान्यवर तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
००००