खेड तालुक्यात रक्ताचा तुडवडा… ● रक्तदान शिबिरे घेण्याची गरज : डॉ. बळीराम गाढवे ● औद्योगिक कंपन्या व तरुण मंडळांनी पुढाकार घ्यावा : डॉ. अमोल बेनके
खेड तालुक्यात रक्ताचा तुडवडा…
● रक्तदान शिबिरे घेण्याची गरज : डॉ. बळीराम गाढवे
● औद्योगिक कंपन्या व तरुण मंडळांनी पुढाकार घ्यावा : डॉ. अमोल बेनके
महाबुलेटीन न्यूज : हनुमंत देवकर
चाकण : खेड तालुक्यात सध्या रक्ताचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा भासत असून गावोगावी तरुण मंडळे, सेवाभावी संस्था व कंपन्यांमधून रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचे आवाहन खेड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व चाकण शहर डॉक्टर्स असोसिएशनचे सचिव डॉ. अमोल बेनके यांच्या वतीने करण्यात आले आहे.
दरवर्षी माहे एप्रिल – मे महिन्यात रक्ताचा नेहमी तुडवडा भासतो. त्यात आता कोविड – १९ चा प्रादुर्भाव झपाटयाने वाढत आहे. महाविद्यालयातील युवा वर्ग हा रक्तदानासाठी महत्वाचा स्रोत आहे. तथापी कोविड – १९ च्या प्रादुर्भावामुळे महाविद्यालये बंद आहेत. तसेच बऱ्याच कंपन्या रक्तदानासाठी अग्रेसर राहत होत्या. परंतु काही कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम ( Work from home ) सुरु केल्यामुळे रक्त संकलनामध्ये अडचणी येत आहेत. कोविड – १९ ची दुसरी लाट झपाट्याने वाढत आहे आणि यामुळेच रक्ताचा मोठ्या प्रमाणावर तुडवडा भासत आहे.
सदर रक्ताच्या तुडवड्यावर मात करण्यासाठी विविध सामाजिक, राजकीय, धार्मिक संस्था, मित्र मंडळ व चाकण औद्योगिक परिसरातील कंपन्या यांनी स्वइच्छेने लहान-मोठी रक्तदान शिबिरे आयोजित करावीत, तसेच रक्त दात्यांनी स्वतः पुढे येऊन रक्तपेढीमध्ये रक्तदान करावे. तसेच आता प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपला वाढदिवस शासनाचे नियम पाळून रक्तदान शिबिराने साजरा करावा. आपण केलेल्या रक्तदानामुळे रुग्णांचा जीव वाचविण्यास मदत होईल, म्हणून या महान कार्यात सहभाग घ्यावा, असे कळकळीचे आवाहन चाकण रक्तपेढीचे संचालक चंद्रकांत हिवरकर यांनी केले आहे.
—–