खेड तालुक्यात आज १५८ कोरोना रुग्ण आढळले, तीन जणांचा मृत्यू, चाकणला सर्वाधिक ३४ रुग्ण,
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
राजगुरुनगर : खेड तालुक्यात शनिवार (दि. १९) रोजी १५८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ८८७ झाली आहे. आतापर्यंत कोरोना बाधितांची एकूण संख्या ५६८२ वर गेली आहे. आज कुरकुंडी येथील ७३ वर्षीय पुरुष, भोसे येथील ८२ वर्षीय पुरुष व वाफगाव येथील ८० वर्षीय पुरुष असा ३ वृद्ध रुग्णांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती पंचायत समिती सभापती अंकुश राक्षे आणि डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.
कोरोना बाधितांमध्ये राजगुरूनगर नगरपरिषद हद्दीतील १४, चाकण नगरपरिषद हद्दीतील ३४ आणि आळंदी नगरपरिषद हद्दीतील २० तसेच ग्रामीण भागातील ९० पैकी दोंदे, चिंबळी, कुरुळीतील प्रत्येकी ३ रुग्ण, आंबेठाण, बिरदवडी, येलवाडी, राक्षेवाडी, सांडभोरवाडी, गोळेगाव, शेलगाव, भोसे येथील प्रत्येकी २ रुग्ण, काडाचीवाडी, खालूंब्रे, निघोजे, वाकी खु., बुट्टेवाडी, ढोरे भांबुरवाडी, होलेवाडी, टाकळकरवाडी, संतोषनगर, सातकरस्थळ, भोसे, चऱ्होली खु., कोयाळी, मरकळ, सोळू, वडगाव घेनंद, रासे, शेलपिंपळ्गाव, कडधे, गुंडाळवाडी, जऊळके खु., वाफगाव येथील प्रत्येकी १ रुग्ण, नाणेकरवाडी ९ रुग्ण, मोई ४ रुग्ण, मेदनकरवाडी ९ रुग्ण तर महाळुंगे व खराबवाडी येथील प्रत्येकी ११ रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान राजगुरुनगर, चाकण, आळंदी शहरातील करोना बाधितांची संख्या ६८ तर ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची संख्या ९० पर्यंत गेली आहे. आत्तापर्यंत एकूण १३० बाधितांचा मृत्यू झाला आहे.
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेमार्फत राजगुरुनगर शहरातील शुक्रवार (दि.१८) आणि शनिवार (दि,१९) या दोन दिवसात ९२६९ कुटुंबांपैकी ४५०६ कुटुंबांची तपासणी झाली असून रॅपिड एंटीजन टेस्टमध्ये ३ संशयीत रुग्ण आढळून आले आहेत, त्यापैकी १ रुग्णास त्याचे घरीच क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रकाश पाटील यांनी दिली.