खेड तालुक्याची सुकन्या कु. आदिती इंगळे हिची श्रीलंकेत होणा-या मिस इंडिया स्पर्धेसाठी निवड…
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
चाकण : श्रीलंकेत होणा-या मिस इंडिया स्पर्धेसाठी Woggish miss India international व गुगलच्या वतीने घेण्यात आलेल्या वीस हजार स्पर्धकांच्या मधून तीस जणींची निवड झाली. त्या तीस स्पर्धकांच्या मधून गोवा येथे फायनलसाठी दहा जणींची निवड करण्यात आली. त्यात खेड तालुक्यातील चाकण येथील आदिती इंगळे ही अव्वल ठरली.
फेब्रुवारी 2021 मध्ये श्रीलंकेत होणा-या मिस इंडिया स्पर्धेसाठी आदितीची निवड झाली आहे. त्यानिमित्ताने तिचा चित्रपट निर्माते व सामाजिक कार्येकर्ते संदीप राक्षे व सिनेमॅटोग्राफर मारूती तायनाथ यांनी आदितीच्या घरी जाऊन सन्मान केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.