बैलगाडा शैकिनांचा मित्र हरपला…प्रसिद्ध बैलगाडा मालक काळाच्या पडद्याआड खेड तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष विनायक लवंगे यांचे निधन
बैलगाडा शैकिनांचा मित्र हरपला…प्रसिद्ध बैलगाडा मालक काळाच्या पडद्याआड
खेड तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष विनायक लवंगे यांचे निधन
महाबुलेटीन न्यूज
चाकण : कोरेगाव बुद्रुक सोसायटीचे माजी चेअरमन, प्रसिद्ध बैलगाडा मालक, उद्योजक व खेड तालुका युवक काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष विनायक लवंगे ( वय 46 वर्षे ) यांचे आज ( दि. २२ एप्रिल ) पहाटे निधन झाले. ते खेड तालुका अन्नधान्य वितरण दक्षता समितीचे संचालक, सुमन ग्रामीण पतसंस्था संचालक आदी संस्थांवर कार्यरत होते.
त्यांच्यामागे आई, वडील, पत्नी, भाऊ तानाजी, मुलगा ऋषिकेश, मुलगी हर्षदा असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे खेड तालुका व पश्चिम खोऱ्यातील पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.