Saturday, August 30, 2025
Latest:
खेडजयंतीपुणे जिल्हाविधायकविशेषसामाजिक

खेड तालुका वकील संघटना व खेड तालुका विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती निमित्त रक्तदान शिबिर संपन्न

खेड तालुका वकील संघटना व खेड तालुका विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती निमित्त रक्तदान शिबिर संपन्न 

 

महाबुलेटीन न्यूज : शिवाजी आतकरी
राजगुरूनगर : खेड तालुका वकील संघटना व खेड तालुका विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंतीचे औचित्य साधून जिल्हा व सत्र न्यायालय खेड या ठिकाणी रक्तदान शिबिर संपन्न झाले. रक्तदान शिबिराचे उदघाटन खेड, जिल्हा व सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश तथा खेड तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष मा. श्री. एन. के. ब्रह्मे साहेब व खेड तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड संजय सुदामराव पानमंद यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. 

या कार्यक्रमासाठी जिल्हा न्यायाधीश मा. श्री. ए. एम. अंबाळकर साहेब, मा. श्री. एस. एन. पाटील साहेब, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर मा. श्रीमती एस. एस. पाखले मॅडम, मा. श्री. के. एच. पाटील साहेब, मा. श्री. जी. बी. देशमुख साहेब, दिवाणी न्‍यायाधिश कनिष्‍ठ स्‍तर मा. श्रीमती आर. डी. पतंगे मॅडम, मा. श्री. डी. बी. पतंगे साहेब, मा. श्री. पी. डी. देवरे साहेब, मा. श्रीमती एन. एस. कदम मॅडम तसेच खेड वकील संघटनेचे उपाध्यक्ष अॅड प्रफुल्ल गाढवे, उपाध्यक्ष अॅड. प्रदीप ऊर्फ अतुल गोरडे, सचिव अॅड कालिदास दौंडकर , सचिव अॅड. शीतल बडदे, खजिनदार अॅड. शंकर उर्फ कोंडीभाऊ कोबल, लोकल ऑडिटर अॅड. योगेश मोहिते, सदस्य अॅड. अमोल तळेकर, सदस्य अॅड. अजय पडवळ, सदस्य अॅड. शुभांगी डुबे, खेड वकील संघटनेचे सर्व ज्येष्ठ वकील बंधू-भगिनी उपस्थित होते.

खेड तालुका वकील संघटनेचे सदस्य अॅड. सुनील वाळुंज यांनी विक्रमी 106 वेळा रक्तदान केल्याबद्दल तसेच खेड तालुका वकील संघटनेचे ज्येष्ठ सदस्य अॅड. स्वानंद दिक्षित यांनी विक्रमी 75 वेळा रक्तदान केल्याबद्दल त्यांचा खेड तालुका वकील संघटनेच्या वतीने जिल्हा न्यायाधीश मा. श्री. एन. के. ब्रम्हे साहेब व खेड तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. संजय सुदामराव पानमंद यांच्या शुभहस्ते विशेष सन्मान करण्यात आला. 

 

रक्तदान शिबिरामध्ये न्यायाधीश, वकील, न्यायालयीन कर्मचारी, पक्षकार यांनी सहभाग घेतला व रक्तदान करून मोलाचे सहकार्य केले. यावेळी एकूण 55 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदात्यांना सर्टिफिकेट आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सदर रक्तदान शिबिर ओम ब्लडबँक पुणेचे आकाश जगताप यांचे सहकार्याने आयोजित करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक खेड तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. संजय सुदामराव पानमंद यांनी केले. खेड जिल्हा व सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मा श्री. एन. के. ब्रम्हे साहेब यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष अॅड. अतुल गोरडे यांनी केले, तर अॅड. अमोल तळेकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!