खेड तालुका मराठा मोर्चाच्या वतीने केंद्र व राज्य सरकारचा जाहिर निषेध…
खेड तालुका मराठा मोर्चाच्या वतीने केंद्र व राज्य सरकारचा जाहिर निषेध…
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
राजगुरुनगर : केंद्र व राज्य सरकार यांचा खेड तालुका मराठा मोर्चाच्या वतीने पंचायत समिती खेड आवार येथे जाहिर निषेध करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कोरोना नियमानुसार सामाजिक अंतर ठेऊन घोषणा देण्यात आल्या.
केंद्र व राज्य यांनी तातडीने पाउल उचलून मराठा समाजाला न्याय द्यावा, असा ठराव सकल मराठा बांधव म्हणून घेण्यात आला. याप्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती अंकुश राक्षे, मराठा सेवक वामन बाजारे यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी नगरसेवक शंकर राक्षे, मनसे नेते मंगेश सावंत, दीपक थिगळे, वकील अनिल राक्षे, माणिक होरे, चेतन शेटे, रणजीत सुर्वे, सत्यवान शिंदे, वामन गव्हाणे, वकील शुभम घाडगे इत्यादी मराठा बांधव उपस्थित होते.
—–