खेड तालुका मराठा क्रांती मोर्चा आक्रमक, नोंदवला निषेध, सोमवारी पुण्यात पत्रकार परिषद
खेड तालुका मराठा क्रांती मोर्चा आक्रमक, नोंदवला निषेध, सोमवारी पुण्यात पत्रकार परिषद
महाबुलेटीन न्यूज
चाकण : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस आंध्र प्रदेशातील श्री तिरुमला बालाजी देवस्थान परिसरात बंदी घालण्यातआल्याच्या विरोधात खेड तालुका मराठा क्रांती मोर्चा अधिक आक्रमक झाला असून या घटनेचा जाहीर निषेध नोंदवला आहे. याबाबतचाकण येथे मराठा समाज बांधवांची तातडीची बैठक पार पडली. यात अनेक शिवप्रेमींनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.
याविषयी आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करण्यात आला असून त्यांना तीन दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. यासंदर्भात पुणेयेथील पत्रकार भवनात सोमवारी पत्रकार परिषद आयोजित केली आहे. तसेच बुधवारी मुख्यमंत्र्यांना भेटून सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.
याप्रकरणी त्वरित निर्णय न झाल्यास थेट तिरुपती येथे जाऊन जाहीर निषेध आंदोलन करण्याचा ईशारा मराठा क्रांती मोर्चासंयोजकांच्या वतीने राज्य समन्वयक मनोहर वाडेकर, मराठा माजी सरपंच अशोक मांडेकर, माजी सरपंच, विद्यमान ग्रा. पं. सदस्यदत्तात्रय मांडेकर यांनी दिला आहे.
0000