Thursday, April 17, 2025
Latest:
उद्योग विश्वखेडपिंपरी चिचंवडपुणे जिल्हाप्रादेशिकमहाराष्ट्रविशेष

खेड तालुका क्रेन असोसिएशनच्या वतीने डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ दोन दिवस उत्स्फूर्त बंद, बंदला १०० टक्के प्रतिसाद, क्रेन चौकात उभ्या करून शासनाचा निषेध

खेड तालुका क्रेन असोसिएशनच्या वतीने डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ दोन दिवस उत्स्फूर्त बंद, बंदला १०० टक्के प्रतिसाद, क्रेन चौकात उभ्या करून शासनाचा निषेध
खेड तालुक्यातील क्रेन मालक/चालकांनी डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ दोन दिवस क्रेन रस्त्यावर उभ्या करून उत्स्फूर्तपणे बंद पाळला..

महाबुलेटीन न्यूज
चाकण : खेड तालुका क्रेन असोसिएशनच्या वतीने दि. १९ व २० सप्टेंबर २०२१ रोजी डिझेल दरवाढ व वाढत्या महागाईमुळे बंद पुकारण्यात आला. या बंदला खेड तालुक्यात १०० टक्के प्रतिसाद मिळाला. क्रेन मालकांनी आपल्या क्रेन भर चौकात उभ्या करून डिझेल दरवाढीच्या विरोधात निषेध नोंदविला.

गेली पाच ते सहा वर्षापासून क्रेन कामाचे दर एकच असून सद्यस्थितीला क्रेन डिझेल दरवाढ ऑपरेटरचे वाढलेले पगार क्रेनच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात झालेली दरवाढ तसेच इतर खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने क्रेनच्या कर्जाचे हप्ते भरणे देखील मुश्कील झाले आहे. यामुळे खेड तालुका असोसिएशनचे अध्यक्ष सचिन किरण मांजरे, उपाध्यक्ष प्रमोद बाळासाहेब कड व खेड तालुका क्रेन अयोगिएशनचे सर्व पदाधिकारी, सर्व सभासद यांच्या वतीने क्रेन भाडे दरवाढी बाबत शासनाला निवेदन देण्यात आले.

● क्रेन भाडे संदर्भात नियम व अटी :-
————————————
१) क्रेनचे भाडे किमान दोन तासांचे द्यावे लागेल. यामध्ये क्रेन येणे जाणेसाठी १ तास राहील.
२) शिफ्टनुसार क्रेन भाडे तत्वावर असल्यास क्रेन, फोर्कलिफट कामाचे ९ तासाची एक शिफ्ट असेल व त्यामध्ये
एक तास हा जेवणासाठी असेन.
३) शिफ्ट नुसार क्रेन भाडे तत्वावर असल्यास क्रेन / फोर्कलिफ्ट कामाचे ९ तासाचे तासांपेक्षा जास्त काम झाल्यास
९ तासांच्या पुढील वेळेचा ओव्हरटाईम यावा लागेल.
४) महिना भाडेतत्वावर क्रेनचे, फोर्कलिफ्टचे काम हे २६ दिवसांकरीता प्रति दिवस ९ तास काम राहील यामध्ये क्रेनचे / फोर्कलिफटचे डिझेल पार्टीला द्यावे लागेल.
५) महिना भाडेतत्वावर क्रेन / फोर्क लिफ्ट लागत असल्यास ५० % रक्कम अॅडवान्स म्हणुन द्यावी लागेल.
६) क्रेन / फोर्क लिफ्टने काम करत असताना भाडेकरूचे कोणतेही नुकसान झाल्यास त्याची सर्व जवाबदारी ही भाडेकरूची राहील. क्रेन, फोर्कलिफ्ट मालक अथवा ऑपरेटर त्यास जबाबदार राहणार नाही.
७) क्रेन/फोर्कलिफ्ट कामाचे बिल दिल्यानंतर १५ दिवसांचे आत बिल रक्कम अदा करावी लागेल.
८) सर्वांना वरील नियम अटी बंधनकारक असुन नियमबाह्य काम केल्यास कडक कारवाई केली जाईल.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!