खेड पंचायत समिती सभापती अविश्वास ठरावबाबतची याचिका फेटाळली, फेर निवडणूक घेण्याचा मुंबई हायकोर्टाचा आदेश
खेड पंचायत समिती सभापती अविश्वास ठरावबाबतची याचिका फेटाळली, फेर निवडणूक घेण्याचा मुंबई हायकोर्टाचा आदेश
महाबुलेटीन न्यूज
राजगुरूनगर : खेड पंचायत समिती सभापती अविश्वास ठरावबाबतची याचिका आज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली असून फेर निवडणूक घेण्याचा न्यायालयाने आदेश दिला आहे.
खेड पंचायत समिती सभापती विरोधात अविश्वास ठराव मंजुर करण्यात आला होता. त्याला मुंबई हाई कोर्ट मध्ये भगवान पोखरकर यांच्या वतीने विरोध याचिका दाखल केली होती, आज मुंबई हायकोर्टने फेर निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई हायकोर्टचे न्यायाधीश काथावाला आणि जाधव यांनी फेर निवडणूक घेण्याचा आदेश दिला आणि ही अविश्वास ठरावाची याचिका निकालात काढली असल्याची माहिती मुंबई हाय कोर्टचे वकील रोहन होगले यांनी दिली.