एनडीआरएफच्या जवानांनी खराबवाडीतील विहिरीत बुडालेल्या युवकाचा मृतदेह बाहेर काढला
एनडीआरएफच्या जवानांनी खराबवाडीतील विहिरीत बुडालेल्या युवकाचा मृतदेह बाहेर काढला
महाबुलेटीन न्यूज
चाकण : खराबवाडी ( ता.खेड ) येथे चार मित्रांसोबत विहिरीवर पोहायला गेलेल्या २८ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून एनडीआरएफच्या जवानांनी अथक प्रयत्न करून विहिरीत बुडालेल्या युवकाचा मृतदेह बाहेर काढला.
ही घटना शनिवार ( दि. ११ सप्टेंबर ) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. अनिल लुट्टू भारद्वाज ( वय २८, सध्या रा. C/o. दीपक साहनी यांच्या खोलीत, पाटील नगर, खराबवाडी, चाकण, मूळ रा. कानपुर, उत्तरप्रदेश ) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
गावचे पोलीस पाटील किरण किर्ते यांनी घटनेची माहिती म्हाळुंगे पोलिसांना देऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक सारंग चव्हाण यांच्यासोबत घटनास्थळी भेट दिली होती. सोमवारी एनडीआरएफचे कमांडन्ट अनुपम श्रीवास्तव यांच्या मार्गदर्शनाखाली इन्स्पेक्टर महेंद्रसिंग पुनिया, इन्स्पेक्टर एस. के. तिवारी, जवलादास, सोमनाथ साळुंके, राकेश कुमार, दुर्गादास राठोड, चांगदेव के, माधवकुमार झा, वेंकट स्वामी, विकास चौगुले, वैभव राऊत, संजय होळंबे, राजू सातपुते या पथकाने विहिरीत बुडालेल्या युवकाचा मृतदेह रविवारी दुपारी १ वाजता बाहेर काढला. चाकण ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली म्हाळुंगे पोलीस पुढील तपास करीत आहेत.
००००