Wednesday, April 16, 2025
Latest:
खेडनिवडणूकपिंपरी चिचंवडपुणे जिल्हाविशेषसहकार

खराबवाडीतील अनंतकृपा पतसंस्थेवर अनंतकृपा पॅनलचे वर्चस्व, दोन अपक्षांसह चार नवीन चेहऱ्यांना संधी, तीस वर्षांची बिनविरोध निवडणुकीची परंपरा खंडित, घराघरात गॅस सेवा देणारा सेवाभावी कार्यकर्ता शशिकांत कड या युवकाने सर्वाधिक प्रथम क्रमांकाची उच्चांकी मते पटकावली

खराबवाडीतीलअनंतकृपा पतसंस्थेवर अनंतकृपा पॅनलचे वर्चस्व, दोन अपक्षांसह चार नवीन चेहऱ्यांना संधी, तीस वर्षांची बिनविरोध निवडणुकीची परंपरा खंडित,
घराघरात गॅस सेवा देणारा सेवाभावी कार्यकर्ता शशिकांत कड या युवकाने सर्वाधिक प्रथम क्रमांकाची उच्चांकी मते पटकावली

अनंतकृपा पतसंस्था संचालक निवड महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर

चाकण : चाकण औद्योगिक नगरीतील खराबवाडी ( ता. खेड ) येथील मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या अनंतकृपा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत अत्यंत चुरशीच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत अनंतकृपा पॅनेलने वर्चस्व राखले. पॅनेलचे चार उमेदवार निवडून आले, तर तीन उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने पॅनलचे एकूण सात उमेदवार निवडून आले, तर अपक्ष मधून दोन उमेदवार निवडून आले. या निवडणुकीत सभासदांनी चार नवीन चेहऱ्यांना संधी दिली.

हरिश्चंद्र कांबळे यांनी निवडणूक अधिकारी, तर सचिव शिवाजी खराबी यांनी सहाय्यक म्हणून काम पाहिले. या निवडणुकीमुळे सलग तीस वर्षांची बिनविरोध निवडणुकीची परंपरा खंडित झाली. घराघरात गॅस सेवा देणारा सेवाभावी कार्यकर्ता निवेदक शशिकांत कड या युवकाने सर्व उमेदवारांपेक्षा सर्वाधिक प्रथम क्रमांकाची ७४६ उच्चांकी मते पटकावली.

अनंतकृपा पतसंस्था निवडणूक निकाल

विजयी उमेदवार त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे :-

# सर्वसाधारण उमेदवार :-

. शशिकांत अर्जुन कड७४६,

. सतीश ज्ञानोबा खराबी६४०,

. सचिन सोपान कड५९६,

. माणिक गुलाब खराबी५९६,

. शंकर नारायण खराबी५५५,

. सोपान तुकाराम खराबी५५४

अनंतकृपा पतसंस्था बिनविरोध उमेदवार # बिनविरोध निवड झालेले उमेदवार :-

इतर मागासवर्गीय उमेदवार :- भरत सुदाम बिरदवडे

महिला प्रवर्ग :- कल्पना विलास खराबी, कविता गोरक्षनाथ कड.

महाळुंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त दिला होता. ग्रामस्थ सभासदांनी भंडाऱ्याची उधळण करीत जल्लोष करून विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!