Thursday, April 17, 2025
Latest:
खेडगुन्हेगारीपिंपरी चिचंवडपुणेपुणे जिल्हाप्रादेशिकमहाराष्ट्रविशेष

खराबवाडीत वीस वर्षीय तरुणीकडून अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण, पोक्सो अंतर्गत तरुणीवर गुन्हा दाखल

खराबवाडीत वीस वर्षीय तरुणीकडून अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण, पोक्सो अंतर्गत तरुणीवर गुन्हा दाखल

महाबुलेटीन न्यूज

महाळुंगे इंगळे : चाकण उद्योग नगरीतील खराबवाडी ( खेड ) येथे एका वीस वर्षाच्या तरुण मुलीने साडे सोळा वर्षीय बालकासोबतशारीरिक संबंध करून लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित बालकाने महाळुंगे पोलीस चौकीतदिलेल्या फिर्यादीवरून सारा सिटीतील एका तरुणीवर लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम कलम ( पोक्सो ) प्रमाणे डिसेंबर २०२२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हि घटना एप्रिल २०२२ या महिन्यात खराबवाडी हद्दीतील चाकण ते तळेगावकडे जाणारे रोडवरीलइंडीयन ऑइल पेट्रोल पंपाचे मागील एक ते दीड किलोमीटर अंतरावरील शेतामध्ये घडली.

फिर्यादी बालक हा खराबवाडीत एका भाड्याच्या खोलीत राहत होता. त्याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, त्या दिवशी मी सदरतरुणी दोघेजन फोनवर बोललो, तेंव्हा ती मला आपण फिरायला जाऊ, मी खराबवाडी ग्रामपंचायत जवळ येते असे म्हणाली. तीआल्यानंतर आम्ही दोघे जण चाकण ते तळेगाव जाणारे रोडवरील इंडीयन ऑइल पेट्रोल पंपाचे बाजुने मागे जाणारे रोडने दोघेही पायीचालत एक ते दिड किलोमीटर असलेल्या शेतात गेलो. तेंव्हा सदर तरुणी ही मला म्हणाली की, आपण याच ठिकाणी बसुन गप्पा मारतबसु असे बोलुन आम्ही दोघे तेथेच गप्पा मारत बसलो. त्यावेळी साधारण रात्रीचे वाजले होते. त्यानंतर सदर तरुणी मी गप्पा मारतबसलेलो असताना त्या तरुणीने मला स्पर्श करून माझ्यासोबत संभोगाची इच्छा व्यक्त केली, त्यामुळे माझी कामवासना जागृत झाली मी तिचे बरोबर शारीरिक संबंध करण्यास तयार झालो. आमच्यात शारीरिक संबंध आला. त्या घटनेच्या वेळी माझे वय १६ ते साडे १६वर्षेच्या जवळपास होते. त्यामुळे मला सदर कृत्याबाबत पुढे काय घडेल याची जाणीव झाली नाही. परंतु मी १६ वर्षाचा आहे याबाबतसदर तरुणीस माहीती होते. त्यामुळे तीचे बाबत माझी तक्रार आहे. या फिर्यादीवरून सदर तरुणीवर महाळुंगे पोलीस चौकीत बालकांचेसंरक्षण अधिनियम कलम ( पोक्सो ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाळुंगे पोलीस चौकीच्या महीला पोलीस उपनिरीक्षक संगीता भंडरवाड यांनी याबाबत गुन्हा दाखल केला असून वरिष्ठ पोलीसनिरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विलास गोसावी पुढील तपास करीत आहेत.

—————————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!