खराबवाडीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी
कोरोनामुळे घरातल्या घरात केली जयंती साजरी
महाबुलेटीन न्यूज / प्रतिनिधी
चाकण : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता खराबवाडी ( ता. खेड ) येथे घरच्या घरी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी दलित युवक अंदोलन खेड तालुका अध्यक्ष अमोल पाटोळे, माजी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लोकशाहीर यांची जंयती कोरोनामुळे साद्या पद्धतीने घरीच साजरी केली. यावेळी अध्यक्ष अमोल पाटोळे यांनी उपस्थित असणाऱ्यांना घरी रहा, सुरक्षित रहा, मास्कचा वापर करा तसेच स्वतः बरोबर घरच्यांची काळची घ्या असा संदेश दिला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते अनिकेत गायकवाड, प्रवीण गायकवाड, अभिजित पाटोळे, गणेश राजगुरू, तुषार गायकवाड, शंकर नवगिरे, सुधीर राजगुरू, सविता गायकवाड आदी उपस्थित होते. अमोल पाटोळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.