खराबवाडीत भैरवनाथ ओढ्याजवळ अनोळखी महिलेचा डोक्यात दगड घालून खून
खराबवाडीत भैरवनाथ ओढ्याजवळ अनोळखी महिलेचा डोक्यात दगड घालून खून
महाबुलेटीन न्यूज
महाळुंगे इंगळे : खराबवाडी ( ता. खेड ) येथे भैरवनाथ ओढ्याजवळील विनायक रेवजी खराबी यांच्या शेतालगत अनोळखी महिलेचाडोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना शनिवारी ( दि. १९ ) घडली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाआहे. घटनास्थळावर एक छोटा चाकू व रक्ताने माखलेला दगड आढळला आहे. महिलेच्या गळ्यावर चाकूने वार केल्याच्या खुणा असूनडोक्यात दगड घातल्याने चेहरा रक्ताने माखलेला आहे.
महाळुंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे व युनिट तीनच्या पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. गुन्हे शाखेच्या डीसीपी सपना गोरे व एसीपी प्रशांत अमृतकर, गुन्हे शाखा युनिट तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड यांनीघटनास्थळी भेट दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत महिलेचे वर्णन पुढीलप्रमाणे :- अंदाजे वय २७ ते ३०, अंगावर निळ्या रंगाचे टॉप्स व डार्कनिळ्या/काळ्या रंगाचे लेगीज, फिक्कट निळ्या आकाशी रंगाचे वुलनचे स्वेटर, गळ्यात मंगळसूत्र, पायात पैंजण, आपल्या परिसरातूनकोणी बेपत्ता असल्यास महाळुंगे पोलीस ठाण्याशी मो. ७०२८५३५३२३, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड ( मो. नं. ९९६७६०४००७ ) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
——————