खराबवाडीच्या वाघजाईनगर मधील वाघजाई मंदिरात चोरी, दानपेटी व कपाटातील रोख रकमेसह देवीचे दागिने लंपास
सात चोरटे सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद
महाबुलेटीन न्यूज : खराबवाडी ( ता. खेड ) येथील वाघजाईनगर मधील वाघजाई मंदिरात आज रात्री दीड वाजण्याच्या सुमारास सात अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम व देवीच्या दागिन्यांवर डल्ला मारून पोबारा केला.
चोरट्यांनी मंदिराच्या खिडकीचे गज कापून मंदिरात प्रवेश केला व गाभाऱ्यातील कपाट व दानपेटीचे कुलूप तोडून दानपेटीतील रक्कम ( रक्कम माहीत नाही ) व कपाटातील १५ हजार रोख रकमेसह देवी अंगावरील एक तोळ्याचे मंगळसूत्र व एक नथ असे सोन्याचे दागिने लंपास केले.
याबाबतची फिर्याद मंदिराचे पुजारी लक्ष्मण केसू शेडगे ( वय ५४ वर्षे, रा. वाघजाईनगर, खराबवाडी, चाकण ) यांनी दिली आहे. म्हाळुंगे पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक तपास करीत आहेत.
——-