खराबवाडी गावातील सारा सिटी रोडला चोरट्यानी सहा दुकाने फोडली..!
महाबुलेटीन न्यूज
चाकण : खराबवाडी गावातील सारा सिटी रोडवर असणारे अथर्व इलेक्ट्रॉनिक, एस. आर. बेकरी, स्मार्ट कलेक्शन आणि महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक ही चार दुकाने व दोन मेडिकल दुकाने (दि.३) पहाटेच्या सुमारास शटर उचकटून चोरट्यांनी इलेक्ट्रिक वस्तूंसह गल्ल्यातील रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे.
सारा सिटी रोडवर असणाऱ्या चार दुकाने व दोन मेडिकलचे लोखंडी रॉडच्या सहाय्याने शटर उचकटून महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक या दुकानातून टीव्ही, अर्थव इलेक्ट्रॉनिक मधून फॅन व रोख रक्कम, एस. आर. बेकरी मधून पाचशे रुपये रोख तर उर्वरित दोन मेडिकलमधून नक्की चोरट्यानी किती रक्कम लंपास केली याचा तपास महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत.
घटनास्थळी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस पथकाने भेट देऊन पंचनामा केला आहे. अधिक माहिती घेऊन चोरांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची शोध मोहीम सुरु झाली आहे.