केंद्रीय मंत्री व भाजप नेते नारायण राणे यांच्या खळबळजनक आक्षेपार्ह विधानाचा खेड तालुका शिवसेनेच्या वतीने खरपूस समाचार घेऊन निषेध..
केंद्रीय मंत्री व भाजप नेते नारायण राणे यांच्या खळबळजनक आक्षेपार्ह विधानाचा खेड तालुका शिवसेनेच्या वतीने खरपूस समाचार घेऊन निषेध..
महाबुलेटीन न्यूज । कल्पेश भोई
चाकण, पुणे : केंद्रीयमंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. मात्र, उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना नारायण राणेंनी खळबळजनक आणि वादग्रस्त विधान केले. या वादग्रस्त विधानाचे तीव्र पडसाद आता उमटण्यास सुरुवात झाली आहे. त्यांच्या विधानावर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले असून, खेड तालुका शिवसेनेचे वतीने आज चाकण ( ता.खेड ) येथे तिखट शब्दात निषेध करण्यात आला.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेबाबत ते काय डॉक्टर आहेत का ? तिस-या लाटेचा कोठुन आवाज आला त्यांना ? त्यांना आणि ती पण लहान मुलांना ? अपशकुनासारख बोलु नको म्हणावं. त्याला बोलायचा अधिकार तरी आहे का ? बाजुला एखादा सेक्रेटरी ठेव आणि बोल म्हणावं. त्यादिवशी नाय का ? किती वर्ष झाली देशाला स्वातंत्र्य मिळुन ? अरे हीरक महोत्सव काय ? मी असतो तर कानाखाली चढवली असती’ असे म्हणुन त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या बाबत आक्षेपार्ह वक्तव्य करुन दोन गटामध्ये तेढ निर्माण होवुन दंगा होणे तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याच्या गैरहेतुने चिथावणी देणारे वक्तव्य केलेले आहे.
मुख्यमंत्री यांचे बाबत अपशब्द वापरल्याने शिवसैनिक, आक्रमक होवुन त्यातुन काहीतरी अनुचित प्रकार घडावा जेणेकरुन महाराष्ट्रातील परीस्थिती अस्थिर करुन त्याचा गैरफायदा घेऊन होणाऱ्या परिणामांची कल्पना असताना सदर वक्तव्यामुळे शिवसैनिकांच्या व सामान्य नागरिकांच्या भावना दुखविल्या गेल्या असून त्यामुळे विविध गटांमध्ये द्वेष व शत्रुत्वाची भावना निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. अशा त्यांच्या वक्तव्यामुळे जनमानसामध्ये भितीदायक वातावरण निर्माण झालेले असुन त्यामुळे सार्वजनिक शांततेचा भंग होवुन त्यातुन मोठा वाद होवुन दंगा घडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. केंद्रीय सुक्ष्म लघु उदयोग मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याचा खेड तालुका शिवसेनेच्या वतीने खरपूस शब्दात समाचार घेऊन निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी पुणे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अशोक खांडेभराड, उपजिल्हा प्रमुख शिवाजी वर्पे, तालुका प्रमुख रामदास धनवटे, जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, महिला आघाडीच्या नेत्या विजयाताई शिंदे, किरण गवारे, बापूसाहेब थिटे, प्रकाश वाडेकर, लक्ष्मण जाधव, विजय शिंदे, धनंजय बापू थिटे, विशाल पोतले, माऊली कड, चंदन मु-हे, पांडुरंग गोरे, शेखर पिंगळे, संतोष शिळवणे, पांडुरंग शिळवणे, विजया जाधव, कविता करपे, संगिता फपाळ, अनिल मिसर, मंगेश पऱ्हाड, उर्मिला सांडभोर यांच्यासह शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
खेड तालुका शिवसेनेच्या वतीने चाकण पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक रजपुत यांना निवेदन देण्यात आले व राणे यांच्यावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी चाकण पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता.
००००