काव्यमंच : स्वातंत्र्यदिन विशेष – भारताला पुष्पहार
🇮🇳🌼 भारताला पुष्पहार🌼🇮🇳
🌸🌼🌸🌼🌸🌼🌸
🌸🌸
🌼
रुप भावतं आम्हास
माझ्या भारताचं न्यारं
असा नाही लाभणार
देश देशात हजार॥धृ॥
सत्तत्येचा शांततेचा
ज्याने केला पुरस्कार
असा देश हा महान
रुप आम्हास हे प्यारं॥१॥
त्याच्या परि नाही पण
त्याला लाभला शेजार
पाक चिन्यांच्या सारखा
नको असाही बेजार॥२॥
जरी शेजारी बेजार
पण देश हा झुंजार
झुंज अशी काही दिली
पाक जाहला बेकार॥३॥
पाक असो असो चिनी
करु पुरतीच हार
आज स्वातंत्र्य दिनाला
भारताला पुष्पहार ॥४॥
— निसर्गसखी सौ मंगला मधुकर रोकडे
*🇮🇳🌸🌼🌸🇮🇳 🇮🇳🌸🌼🌸🇮🇳*
*🌸🌼🌸*
*💐*.