खेडगुन्हेगारीपिंपरी चिचंवडपुणे जिल्हाविशेष

कपड्याचे दुकान फोडून कपडे चोरणाऱ्या चोरट्यास अटक, दोन लाखाचा ऐवज जप्त

शेलपिंपळगाव येथील कपडयाचे दुकान फोडुन कपडे चोरीच्या गुन्हयाची उकल, चोरी करणारा आरोपी जेलबंद, लाखोंचा मुददेमाल जप्त चाकण पोलीसांची कारवाई

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क 
चाकण : शेलपिंपळगाव येथील जय हनुमान कलेक्शन या दुकानातून एक लाख रुपये किंमतीचे कपडे चोरणाऱ्यास चाकण पोलिसांनी गजाआड केले आहे. याप्रकरणी दोन जणांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कपडयाचे दुकानाचा पाठीमागील बाजुने पत्रा कापून दुकानात अज्ञात चोरट्याने प्रवेश करून दुकानातील सुमारे १,००,०००/- रु. किंमतीचे विक्रीसाठी ठेवलेले कपडे चोरी करून नेले होते. ही घटना  दिनांक १८ जून २०२१ रोजी मध्यरात्री घडली, त्याबाबत कापड दुकानदार राजाराम नारायण आलम (रा. बहुळ ता. खेड जि. पुणे ) यांनी चाकण पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिल्यानंतर अज्ञात व्यक्ती विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

चाकण पोलीस स्टेशन कडील गुन्हे शोध पथकाने वरील घटनास्थळी जावून गुन्हयाचे घटने बाबत माहिती घेतली, त्याच प्रमाणे गुन्हयाचे परीसरातील सीसीटीव्ही कॅमे-यांचे फुटेज तपासले असता गुन्हयातील मुददेमाल वाहून नेण्यासाठी वापरलेला टेम्पो ( एम एच १४ सी पी ३१९१)  हा असल्याचे तपास पथकाचे लक्षात आले. त्याव्दारे चाकण पोलीसांनी सदर गुन्हयाचा सखोल तपास करत या गुन्ह्यातील आरोपी सचिन मधुकर वाघ (वय ३० वर्षे, रा. राम मंदिरा जवळ, वडगाव रोड, आळंदी ता. खेड जि. पुणे) यास ताब्यात घेतले. सुरूवातीला वरील आरोपीने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्याचेकडे सखोल चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले.

त्यास दिनांक २१/०६/२०२१ रोजी अटक करून त्यास खेड न्यायालयाने दिनांक २५/०६/२०२१ पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. पोलीस कोठडी दरम्यान आरोपीने त्याचा सहकारी शिवा ( पुर्ण नाव माहिती नाही ) याचेसह मिळुन चोरी केलेली असून सदर चोरीचा माल हा टेम्पो ( नं. एम एच १४ सी पी ३१९१ ) यामध्ये वाहून नेल्याची कबुली देत चोरी केलेले सर्व कपडयांचा मुददेमाल काढुन दिला आहे. आरोपी सचिन वाघ कडुन गुन्हयातील चोरून नेलेले १,००,०००/- रू. कपडे तसेच गुन्हयात वापरलेला सुमारे १,००,०००/- रु. टेम्पो नं. एम एच १४ सी पी ३१९१ असा एकुण सुमारे २,००,०००/- रु चा मुददेमाल जप्त करण्यात आलेला आहे.

सदरची कारवाई  पोलीस आयुक्त  कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त, परिमंडळ- १  मंचक इप्पर, सहा. पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांचे सुचना व मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत तसेच सहायक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड, पो.हवा. सुरेश हिंगे, राजू जाधव, पो.ना. हनुमंत कांबळे, संदिप सोनवणे, पो.कॉ. नितीन गुंजाळ, निखील वर्पे, अशोक दिवटे, प्रदिप राळे, विलास कांदे, म.पो.कॉ. सुप्रिया गायकवाड यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड हे करीत आहेत.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!