कान्हेवाडी तर्फे चाकण ग्रामपंचायतच्या सरपंचपदी भाऊसाहेब पवार, तर उपसरपंचपदी राहुल येवले यांची बिनविरोध निवड…
कान्हेवाडी तर्फे चाकण ग्रामपंचायतच्या सरपंचपदी भाऊसाहेब पवार, तर उपसरपंचपदी राहुल येवले यांची बिनविरोध निवड…
महाबुलेटीन न्यूज : कान्हेवाडी तर्फे चाकण ग्रामपंचायतच्या सरपंचपदी भाऊसाहेब पवार, तर उपसरपंचपदी राहुल येवले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
कान्हेवाडी तर्फे चाकण येथे ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये सरपंच व उपसरपंचपदासाठी एकेकच अर्ज आल्याने सरपंचपदी भाऊसाहेब एकनाथ पवार, तर उपसरपंचपदी राहूल वरसू येवले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित सदस्य सुवर्णा राजेंद्र ढोरे, स्वाती प्रभाकर येवले, व्योमेश्वरी भूषण ढोरे, आरती राहूल खैरे व अनिल आत्माराम कडलक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
निवडणूक निर्णय अधिकारी विजय रामचंद्र पडवळ (कृषी पर्यवेक्षक) यांचे अधिपत्याखाली व ग्राम विकास अधिकारी अरुण हुलगे यांचे उपस्थितीत ही निवडणूक पार पडली.
कान्हेवाडी ग्रामस्थांच्यावतीने पोलीस पाटील राजेश येवले यांनी नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांचे अभिनंदन करून नूतन कार्यकारीणीला पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.