”कांचन ग्रुप” च्या वतीने कोविड योध्यांचा सन्मान,
दिवाळी शुभेच्छांबरोबर फराळाचे वाटप !
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
राजगुरूनगर : दीपावलीचे औचित्य साधून आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या संकल्पनेतून ज्या कर्मचाऱ्यांनी कोरोना महामारीच्या संकटातून बाहेर पडण्याच्या काळात स्वतःची परवा न करता इतरांची काळजी घेतली व त्यांना वेळोवेळी आवश्यक सोई -सुविधा पुरवल्या अशा योद्ध्यांचा योग्य तो सन्मान व त्या बरोबरच दिवाळी फराळ वाटप करण्याचा मानस कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केला. त्यांच्या या संकल्पनेस प्रताप ढमाले व राष्ट्रवादीच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षा कांचनताई ढमाले (कांचन ग्रुप) यांच्या वतीने त्यास मूर्त रूप देण्यात येऊन तो उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात आला.
या मध्ये खेड पोलीस स्टेशन मधील अधिकारी, कमर्चारी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, कडूस येथील डॉक्टर, कर्मचारी व कडूस ग्रामपंचायतचे कर्मचारी यांचा सन्मान करून दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. या वेळी खेड तालुका राष्ट्रवादीचे पक्षाचे तालुका अध्यक्ष कैलासराव सांडभोर, ऍडव्होकेट अरुण मुळूक, किसन भाऊ नेहेरे, बाळासाहेब बोंबले, चांगदेव ढमाले, बाळासाहेब धायबर, मारुती जाधव, पंडित मोढवे, संदीप धायबर, शशिकला ढमाले, खेड तालुका महिला राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षा संध्याताई जाधव, मंगलताई जाधव, सुजाताताई पचपिंड, बेबीताई कड, आशाताई तांबे, उर्मिलाताई गुरव, सुलभाताई चिपडे, भावनाताई शेंडे, प्रतापदादा ढमाले यांच्या बरोबर त्यांचा मित्र परीवार व कार्यकर्ते यांची विशेष उपस्तिथी दिसून आली.