Friday, May 9, 2025
Latest:
पिंपरी चिचंवडसामाजिक

कोरोना वाढतोय! पिंपरीतील हे पूल वाहतुकीसाठी बंद

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाकड पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील थेरगाव परिसरात वाहतुकीमध्ये बदल
महाबुलेटीन नेटवर्क : सोमनाथ नढे
पिंपरी-चिंचवड : वाकड पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील थेरगाव परिसरात पडवळनगर, सुंदर कॉलनी, गणराज कॉलनी, दगडु पाटील नगर, क्रांतीवीर नगरच्या भागात कोरोना विषाणू बाधिक लोक मिळुन आले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये 14 जुलै ते 23 जुलै 2020 या कालावधीमध्ये लॉकडाऊन जाहिर करण्यात आलेला आहे.
त्यानुसार यापुर्वीचे निर्बंध रद्द करण्यात येऊन आता अत्यावश्यक सेवेतील वाहने ( उदा. फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहीका, वैद्यकीय सेवेतील स्टाफ, इ. ) खेरीज तात्पुरत्या स्वरुपातील आदेशानुसार  पिंपरी सांगवी वाहतुक विभागांतर्गत कोरोना रोगाचे वाढत्या प्रादुर्भावाचा विचार करता काळेवाडी-पिंपरी या दोन गावांना जोडणारे पुल अनुक्रमे काळेवाडी-पिंपरी पूल लकी बेकरी जवळ तसेच पवनेश्वर-काळेवाडी या पुलावर सार्वजनिक वाहतुकीकरीता 14 जुलै 2020 ते 23 जुलै 2020 या कालावधीपर्यंत बंदी करण्यात आल्याची माहिती पिंपरी-चिंचवड वाहतुक शाखेचे पोलीस उपआयुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!