Saturday, August 30, 2025
Latest:
आंबेगावगुन्हेगारीपुणे जिल्हाविशेष

कळंब येथे घोडनदीच्या पात्रात महिलेचा मृतदेह आढळला

 

महाबुलेटीन न्यूज :
घोडेगाव : आंबेगाव तालुक्यातील कळंब गावाच्या हद्दीत घोडनदीच्या पात्रात वीस ते पंचवीस वय असलेल्या एका महिलेचा मृतदेह आढळला असून अद्याप ओळख पटललेली नाही.

राजेंद्र भागूजी शिंदे ( रा. कळंब, ता. आंबेगाव, जि. पुणे ) हे दि. २३ नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास कळंब हद्दीतील घोडनदी पात्रात मासेमारी करण्यासाठी गेले असता त्यांना अंदाजे २० ते २५ वय असलेल्या महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. महिलेच्या अंगावर काळ्या रंगाचे स्वेटर व खाली लाल रंगाचा टॉप होता. याबाबतची माहिती शिंदे यांनी तात्काळ तंटामुक्तीचे अध्यक्ष शिवाजी भालेराव व नितीन भालेराव यांना दिली. या घटनेची माहिती मिळताच मंचर पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. महिलेचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी कोणाला सदर महिलेची माहिती मिळली तर मंचर पोलिस ठाण्याशी संपर्क करावा, असे आवाहन मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!