कडुस गावात दोन तरुणांवर बिबट्याचा हल्ला.. खेड तालुक्यात बिबट्याची दहशत, एका आठवड्यात बिबट्याचा दुसऱ्यांदा हल्ला
कडुस गावात दोन तरुणांवर बिबट्याचा हल्ला.. खेड तालुक्यात बिबट्याची दहशत, एका आठवड्यात बिबट्याचा दुसऱ्यांदा हल्ला
महाबुलेटीन न्यूज । नवनाथ थोरात
वडगाव पाटोळे : कडुस ( ता.खेड ) गावच्या हद्दीतील आगरमाथा येथील भवानजीबुवा मंदीराशेजारी दुचाकीवरून जाणाऱ्या दोन तरुणांवर आज ( दि. ९ ऑगस्ट ) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास हल्ला करून जखमी केले आहे. जखमी तरुणांचे सुदैवाने प्राण वाचले आहेत. पप्पू मोमीन ( वय ३८ ) व सादिक मोमीन ( वय ३४, दोघेही रा. कडुस ) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यासोबत असलेले अमजद शेख यांच्यावर हल्ला झाला नाही. दुचाकीने वेग वाढविल्याने हे तरुण हल्ल्यातून बचावले आहेत.
३ ऑगस्ट रोजी वडगाव पाटोळे येथील एका तरुणावर हल्ला केल्यानंतर अवघ्या सहाव्या दिवशी कडुस गावच्या हद्दीत बिबट्याने हल्ला केल्याने परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. वनविभागाने त्वरित पिंजरा लावून बिबट्या पकडण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. घटनास्थळी वन विभागाचे कर्मचारी पोहोचले आहेत.
००००