कडाचीवाडी येथील ठाकर वस्ती मध्ये ५६ सोलर पॅनल संच वाटप
कडाचीवाडी येथील ठाकर वस्ती मध्ये ५६ सोलर पॅनल संच वाटप
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
चाकण : कडाचीवाडी ( ता. खेड ) येथील ठाकरवस्ती मध्ये अदिवासी ठाकर समाजासाठी मुंबई माता बाल संगोपन केंद्र, खेड यांच्या तर्फे ५६ सौर पॅनल संच देण्यात आले. यामुळे ठाकर समाजातील लोकांच्या चेहऱ्यावर अवर्णनीय असा आनंद झळकत होता. आळंदी रोड लगत असलेली ठाकर वस्ती ४ वर्ष अंधारात होती. ह्या सौर पॅनल संच मुळे त्यांच्या विजेचा व विजबिलाचा कायमचा प्रश्न सुटला आहे.
१००% सौर पॅनल असलेले हे महाराष्ट्रातील दुसरे गाव आहे.
या कामी संस्थेचे सचिव डाॅ. माधव साठे, संचालिका सौ. स्वाती शिंदे, व अशोक मांजरे यांचे सहकार्य लाभले. याप्रसंगी कडाचीवाडी गावचे सरपंच श्री. महादेव विश्वनाथ बचुटे, उपसरपंच सौ. प्रियंका किरण कड, ग्रा.पं.सदस्य सौ. निर्मला शाम कड, सौ. सोनल सोमनाथ कोतवाल, श्री.राजाराम ठाकर, मुख्याध्यापक श्री. संजीव भोसले, बाळु पारधी, माजी उपसरपंच पांडुरंग लष्करे, संतोष ठाकर, बाबाजी ठाकर व इतर मान्यवर उपस्थित होते.