जुन्नरच्या प्रथम महिला आमदार लताताई तांबे यांचे वृद्धापकाळाने निधन
जुन्नरच्या प्रथम महिला आमदार लताताई तांबे यांचे वृद्धापकाळाने निधन
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
जुन्नर : जुन्नर तालुक्याच्या प्रथम महिला आमदार श्रीमती लताबाई श्रीकृष्ण तांबे ( नानी ) (85 वर्षे) यांचे आज शनिवार, दिनांक 29 मे 2021 रोजी ( श्री गणेश चतुर्थी ) सायंकाळी सव्वासात वाजता पुणे येथे वृद्धापकाळामुळे दुःखद निधन झाले. त्यांचा अंत्यविधी उद्या दिनांक 30 मे 2021 रोजी सकाळी 10 वाजता श्री कपर्दिकेश्वर मंदिराजवळ, ओतूर येथे होणार आहे.
स्वर्गीय आमदार कै. श्रीकृष्ण रा. ताबे ( झांबरशेठ ) यांच्या त्या धर्मपत्नी होत्या. 1973 च्या विधान सभा पोट निवडणुकीमध्ये त्या जुन्नर विधानसभा मतदारसंघातून प्रथम महिला आमदार म्हणून निवडून आलेल्या होत्या. त्यानंतर त्या जुन्नर पंचायत समितीवर स्वीकृत सदस्य होत्या. त्याच दरम्यान त्या पुणे जिल्हा महिला दक्षता समितीच्या सदस्या म्हणून पण काम करत होत्या. ग्रामविकास मंडळ ओतूर श्री कपर्दिकेश्वर देवधर्म संस्थेचे अध्यक्ष श्री. अनिलशेठ तांबे, सेवानिवृत्त बँक अधिकारी श्री. शशिकांत तांबे, संरक्षण विभागातून सेवानिवृत्त झालेले श्री. दीपक तांबे, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे मध्ये कार्यरत असलेले श्री. किशोर तांबे सर यांच्या त्या मातोश्री होत.
००००