जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाची नवीन सभासद नोंदणी सुरु, नवीन वाचक संस्था नोंदणी अभियान
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाची नवीन सभासद नोंदणी सुरु, नवीन वाचक संस्था नोंदणी अभियान
महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर
पुणे : शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील वाचकांना त्यांच्या आवडीचे दर्जेदार वाचनीय साहित्य उपलब्ध करुन देऊन त्यांना वाचनाची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, पुणे या कार्यालयाने नवीन वैयक्तिक सभासद व संस्था सभासद नोंदणी सुरु केली आहे.
वैयक्तिक सभासदांना एका वेळी एक ग्रंथ 14 दिवसांसाठी तर संस्था सभासदांना एका वेळी 25 ग्रंथांचा एक संच एक महिन्याच्या मुदतीकरीता दिला जातो.
पुणे शहरात मध्यवर्ती स्थित असलेल्या या ग्रंथालयात विविध विषयावरील दर्जेदार वाचनीय ग्रंथ वाचकांसाठी उपलब्ध आहेत. तरी सर्व नागरिक तसेच शालेय व इतर सामाजिक संस्था यांनी या कार्यालयाचे वैयक्तिक व संस्था सभासद व्हावे व दर्जेदार वाचन साहित्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रीमती श्रेया गोखले यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, पुणे येथे पुढील पत्त्यावर संपर्क साधावा. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, 966/1, सरदार बिल्डिंग, गुरुव्दारासमोर, रविवार पेठ, पुणे 411 002 दूरध्वनी क्रमांक : 020-24463626
————————-