Friday, April 18, 2025
Latest:
पश्चिम महाराष्ट्रपुणे जिल्हामहाराष्ट्रमुंबईविशेषसातारा

जेष्ठ नेते शरद पवार यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पावणे तीन कोटींचा धनादेश सुपूर्द

कोविड १९ संकट निवारण करण्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षक व सेवकांनी दिला एक दिवसाचा पगार

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
मुंबई : कोविड १९ या जागतिक महामारीमुळे ओढवलेल्या संकटाचे निवारण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने केलेल्या आवाहनाला अनुसरून सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षक व शिक्षकेतर सेवकांनी त्यांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी द्यायचा निर्णय घेतला. त्यांच्या मे २०२० महिन्याच्या वेतनातील एक दिवसाच्या वेतनाची रक्कम २ कोटी ७५ लाख ९२ हजार ८२१ रुपयांचा धनादेश ( क्रमांक ०३६८८८ दि. ५/११/२०२० ) संस्थेचे अध्यक्ष जेष्ठ नेते, खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आज ९ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे सुपूर्द केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!