जेष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त चाकण येथे रक्तदान शिबीर व कोविड योद्ध्यांचा सन्मान
महाबुलेटीन न्यूज
चाकण : जेष्ठ नेते शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त तसेच रक्ताची कमतरता लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चाकण शहर व जुन्नर, आंबेगाव, खेड ( जॅक ) केमिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने चाकण मार्केट यार्ड या ठिकाणी रक्तदान शिबिर संपन्न झाले. तसेच लॉकडाऊनच्या काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कोविड योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी चाकण नगरपरिषदच्या तत्कालीन मुख्याधिकारी डॉ. नीलम पाटील, चाकण ग्रामीण रुग्णालयचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. माधव कणकवले, म्हाळुंगे कोविड सेंटरच्या अपेक्षा बोरकर व चाकण नगरपरिषदचे सफाई कर्मचारी शंकर बिसणारे यांना सन्मान चिन्ह देऊन आमदारांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
आमदार दिलीप मोहिते हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाचे आयोजन आमदार दिलीप मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक सेलचे चाकण शहर अध्यक्ष मुबिनभाई काझी, जॅक केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र गोरे, उपाध्यक्ष प्रशांत मुंगसे, माणिक मिसाळ, गणेश शेवकर यांनी केले. यावेळी तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर, खेड तालुका महिला अध्यक्ष संध्याताई जाधव, स्मिताताई शाह, सयाजी गांडेकर, कुमार गोरे, माजी उपसरपंच अशोक बिरदवडे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल नायकवाडी, अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष सरफराज सिकिलकर, उद्योजक राहुल नायकवाडी आदी उपस्थित होते. यावेळी १०१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. प्रत्येक रक्तदात्याला एक थर्मास भेट देण्यात आले. चाकण ब्लड बँकेचे चंद्रकांत हिवरकर यांनी रक्तदानाचे महत्व विशद केले. व्यंकटेश सोरटे यांनी सूत्रसंचालन केले.