Thursday, April 17, 2025
Latest:
खेडदिन विशेषपिंपरी चिचंवडपुणे जिल्हाप्रादेशिकमहाराष्ट्रविशेष

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आदर्शगाव कान्हेवाडी तर्फे चाकण येथे एक हजार देशी झाडांचे लागवडीचा संकल्प….

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आदर्शगाव कान्हेवाडी तर्फे चाकण येथे एक हजार देशी झाडांचे लागवडीचा संकल्प….

महाबुलेटीन न्यूज । हनुमंत देवकर
आज 5 जुन… जागतिक पर्यावरण दिनविशेष…
चाकण : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सर्व जगभर वृक्ष लागवडीचे काम सर्व पर्यावरणप्रेमी व सामाजिक संस्थांकडून होत असताना कान्हेवाडी तर्फे चाकण ग्रामपंचायत व सामाजिक संस्था यांचे संयुक्त सहकार्याने आज गावातील इंद्रायणी नदीच्या किनाऱ्यावरील भागात तसेच रस्त्याच्या दुतर्फा बाजूने व घरांसभोवती आणि शेतांच्या बांधांवर कडूलिंब, पिंपळ, वड, अर्जून, बेहडा, करंज, शिसम, बांबू, मुचकुंद, चिंच, आवळा, ताम्हण, जांभूळ, बहावा, बकूळ आणि लिंबाची झाडे अशी एकूण एक हजार झाडे लावण्याचा संकल्प केलेला असून आज शालेय परिसर व नदी किनारा तसेच रस्त्याच्या कडेने सुमारे दोनशे झाडांची लागवड करण्यात आली.

येत्या आठ दिवसात संपूर्ण गाव परिसरातील मोकळ्या जागेत देशी झाडांची लागवड करुन यावर्षीचे एक हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण केले जाणार आहे. कान्हेवाडी गावात मागील पंचवीस वर्षापासून आजअखेर सुमारे दहा हजार झाडे लावलेली असून त्यांचे सुंदररित्या जतन केलेले आहे. संपूर्ण गावात हिरवीगार झाडे असल्याने गाव आणि गाव परिसरातील वातावरण कायमच अतिशय शुद्ध आणि आल्हाददायक असते. प्रत्येक घराभोवती परसबागा आणि कडूलिंब, आंबा, नारळ, लिंबोणी, पिंपळ अशी आँक्सिजन मुबलक प्रमाणात निर्माण करणारी झाडे वाढवलेली आहेत. दरवर्षी पर्यावरण दिनी नवनवीन देशी झाडांची लागवड करण्याची आणि ती झाडे जगविण्याची व जोपासण्याची परंपरा या गावाने सतत कायम राखलेली आहे. 

भविष्यात नाना-नानी पार्क, अत्याधुनिक क्रिडांगण आणि सुसज्ज मंगल कार्यालय उभारण्याचे मोठे काम ग्रामपंचायत कार्यकारीणीने करण्याची तयारी सुरू केलेली आहे. याकामी कान्हेवाडी गावचे सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य, गावातील युवा कार्यकर्ते, महिला बचत गट आणि सर्व ग्रामस्थ, ग्रामविकास अधिकारी तसेच शाळेतील शिक्षक वृंद यांच्या सहकार्याने गावाच्या विकासासाठी एकजूटीने कामे करण्याचा मनोदय केलेला आहे. 

“चला तर मग झाडे लावूया.. पर्यावरण वाचवू या….”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!