इंडियन ऑइल कार्पोरेशनच्या अध्यक्षपदी पुण्याचे श्रीकांत वैद्य
अध्यक्षपदी प्रथमच मराठी व्यक्तीची नियुक्ती
महाबुलेटीन नेटवर्क / हनुमंत देवकरपुणे : देशातील अग्रगण्य असलेल्या इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल) या भारत सरकारच्या कंपनीच्या अध्यक्षपदी पुण्याचे श्रीकांत माधव वैद्य यांची नियुक्ती झाली आहे. विशेष म्हणजे, आयओसीएलला प्रथमच मराठी व्यक्ती अध्यक्षपदी लाभली आहे. नवोदित इंजिनिअर ते थेट अध्यक्ष अशी त्यांची आयओसीएलमधील कारकीर्द आहे.

