इंटरनॅशनल ह्युमॅन राईट असोसिएशनच्या वतीने वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे यांचा ‘महाराष्ट्राज बेस्ट डॉक्टर’ पुरस्काराने गौरव…
इंटरनॅशनल ह्युमॅन राईट असोसिएशनच्या वतीने वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे यांचा ‘महाराष्ट्राज बेस्ट डॉक्टर’ पुरस्काराने गौरव…
● आमदार दिलीप आण्णा मोहिते पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त प्रा. आ. केंद्राला बेंचेस भेट
● सप्तरंग सोशल फाउंडेशन तर्फे डॉ. पारखे यांचा ‘ कोविड योद्धा’ पुरस्काराने सन्मान
● सप्तरंग सोशल फाउंडेशन, पुणे यांचेकडून प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी, आशा स्वयंसेविका व वैद्यकीय अधिकारी यांना आंब्याच्या रोपांचे वाटप
● गोलेगाव येथील श्री. प्रवीण चौधरी व अमोल चौधरी या बंधूंतर्फे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास इन्वर्टर भेट
महाबुलेटीन न्यूज
शेलपिंपळगाव : मार्च २०२० पासून कोविड महामारीमध्ये सेवा देत असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळगावच्या सर्व कर्मचाऱ्यांचा इंटरनॅशनल ह्युमॅन राईट असोसिएशन यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे यांना ‘महाराष्ट्राज बेस्ट डॉक्टर’ पुरस्काराने तसेच सप्तरंग सोशल फाउंडेशन तर्फे वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे यांचा ‘कोविड योद्धा’ पुरस्काराने सन्मानपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला.
यावेळी असोसिएशनचे वर्किंग चेअरमन श्री. रविराज साबळे व सहकारी उपस्थित होते. तसेच ५ जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सप्तरंग सोशल फाउंडेशन, पुणे यांचेकडून प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी, आशा स्वयंसेविका व वैद्यकीय अधिकारी यांना आंब्याच्या रोपांचे वाटप करण्यात आले.
यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य श्री. सोमनाथ दौंडकर, ग्रामपंचायत सदस्य श्री. अजित इंगळे, शेलपिंपळगावच्या सरपंच सौ. विद्याताई मोहिते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री. सयाजी मोहिते व मान्यवर उपस्थित होते.
गोलेगाव येथील श्री. प्रवीण चौधरी व अमोल चौधरी या बंधूंतर्फे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास इन्वर्टर व आमदार दिलीप आण्णा मोहिते पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त बेंचेस भेट देण्यात आले.
००००