हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ खेड तालुका कार्यकारिणी निवडणूक बिनविरोध, अध्यक्षपदी पुण्यनगरीचे प्रतिनिधी व महाबुलेटीन न्यूजचे मुख्य संपादक हनुमंत देवकर…
तालुका अध्यक्षपदी जेष्ठ पत्रकार हनुमंत देवकर,
सचिवपदी गणेश आहेरकर, तर उपाध्यक्षपदी मिलिंद शिंदे व हमीद शेख
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
चाकण : पुणे जिल्हा पत्रकार संघ संलग्न हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाची आज द्विवार्षिक निवडणूक प्रक्रिया पार पडली. १ नोव्हेंबर २०२० ते ३१ ऑक्टोबर २०२२ या दोन वर्षाच्या मुदतीसाठी घेण्यात आलेल्या कार्यकारिणीच्या नऊ जागांसाठी प्रत्येकी एक असे नऊच अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सूर्यकांत किंद्रे यांनी जाहीर केले, यासाठी संजय इंगुळकर यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.
नवीन पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य पुढील प्रमाणे :- अध्यक्ष हनुमंत देवकर, उपाध्यक्ष मिलिंद शिंदे व हमीद शेख, सचिव गणेश आहेरकर, कोषाध्यक्ष संजय बोरकर, जिल्हा प्रतिनिधी अर्जुन मेदनकर, तर कार्यकारिणी सदस्यपदी श्रीकांत बोरावके, अनिराज मेदनकर, सुनील बटवाल, अयाज तांबोळी, दत्ता घुले, प्रभाकर जाधव, निलेश डोके, भीमाशंकर टाकळकर, बापूसाहेब सोनवणे, ॲड. सोमनाथ नवले, प्रसन्नकुमार देवकर, कुमार नवरे, सल्लागारपदी ॲड. विलास काटे, शिवाजी आतकरी, संजय बोथरा, कल्पेश भोई, हरिदास कड, विवेक बच्चे, रवी साकोरे यांची बिनविरोध निवड झाली.
नवीन कार्यकारिणीचे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, कार्याध्यक्ष शरद पाबळे, विभागीय सचिव बापूसाहेब गोरे, पुणे जिल्हा पञकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, जिल्हासमन्वयक सुनील जगताप, परिषद प्रतिनिधी एम. जी. शेलार यांनी अभिनंदन केले. नूतन पदाधिकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
—–