Saturday, August 30, 2025
Latest:
गुन्हेगारीपुणे जिल्हापुणे शहर विभाग

संतापजनक … एचआयव्हीग्रस्त अल्पवयीन मुलीवर बलात्कार

संस्था चालकावर गुन्हा दाखल, पुण्यातील घटना,
एचआयव्ही पॉझिटिव्ह लोकांसाठी कार्य करणाऱ्या संस्थेच्या अध्यक्षानेच केला प्रताप,

महाबुलेटिन न्यूज
पुणे :
एचआयव्ही पॉझिटिव्ह लोकांसाठी कार्य करणाऱ्या एका संस्थेच्या अध्यक्षानेच आपल्या संस्थेतील एचआयव्हीग्रस्त असलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना पुण्यातील बालाजीनगर येथे घडली आहे. याप्रकरणी संस्थेचा अध्यक्ष हमीद सलमानी ( वय ४५, बालाजीनगर, धनकवडी, पुणे ) याच्या विरुद्ध बलात्कार आणि पॉस्को अंर्तगत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर आरोपीची धनकवडी येथे लाईफ प्रोसेस हेल्प फाउंडेशन नावाने संस्था आहे. हि संस्था एचआयव्ही पॉझिटिव्ह लोकांसाठी सामाजिक कार्य करते. मार्च महिन्यात संस्थेत या मुलीला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. हि मुलगी संस्थेत उपचार घेत असताना आरोपीने या मुलीशी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. सहाय्यक पोलीस निरीक्षक मदने हे याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!