हिंदकेसरी अभिजित कटके व महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांचा खराबवाडीत सत्कार
महाबुलेटीन न्यूज
चाकण : हिंद केसरी अभिजीत कटके व महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांचा खराबवाडीमध्ये म्हाळुंगे व खराबवाडी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
खराबवाडी येथील उद्योगपती मधुकर सातव यांच्या निवासस्थानी अभिजीत कटके व शिवराज राक्षेचा यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भक्ती-शक्तीचे प्रतीक असलेली संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा असलेले स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी श्रीपतीबाबा महाराज पालखी सोहळ्याचे माजी पालखी प्रमुख दत्तात्रय काका भोसले, महाळुंगे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, उद्योगपती मधुकर सातव, माजी उपसभापती अमोल पवार, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे प्रदेश संपर्कप्रमुख व पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे संचालक विनोद महाळुंगकर पाटील, समाजभूषण विनायक तुपे, उद्योजक संतोष भोसले, सुभाष खराबी, माजी उपसरपंच विशाल भोसले, अक्षय गायकवाड, रंजना सातव, अमित सातव, राजेंद्र सातव, मोहिनी सातव, सुजाता सातव, राजेंद्र खराबी, राहुल कड, तानाजी शिंदे, नवले साहेब, निवृत्त मुख्याध्यापक ल. रा. नाणेकर गुरुजी, गणेश नाणेकर, विकास राऊत यांच्यासह महाळुंगे व खराबवाडी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्योगपती मधुकरशेठ सातव यांच्यावतीने अभिजीत व शिवराज यांना प्रत्येकी २५ हजारांचा धनादेश प्रदान करण्यात आला. संतभारती ग्रंथालयाच्या वतीने पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक, पत्रकार हनुमंत देवकर यांच्या हस्ते अभिजित व शिवराज यांना पुस्तके भेट देऊन सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र केसरी मारणारा शिवराज तालुक्याचा तिसरा सुपुत्र
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत खेड तालुक्याचा सुपुत्र शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाडचा पराभव केला. हिंद केसरी व महाराष्ट्र केसरी ही प्रतिष्ठेची कुस्ती स्पर्धा मानली जाते. महाराष्ट्र केसरीचे मैदान मारणारा शिवराज हा चिंबळी येथील हिरामण बनकर व विकी बनकर या पिता-पुत्रानंतर खेड तालुक्यातील तिसरा सुपुत्र ठरला आहे.