हाथरस सामुहिक बलात्कार प्रकरणाचा जिजाऊ ब्रिगेडकडून निषेध
आरोपींना महिन्याच्या फाशी देण्याची केली मागणी
महाबुलेटीन न्यूज : शैलेश काटे
इंदापूर : हाथरस सामुहिक बलात्कार प्रकरणाचा जिजाऊ ब्रिगेडने निषेध केला आहे. आरोपींना एका महिन्याच्या आत फाशीची शिक्षा देण्याची मागणी ही केली आहे.
या संदर्भात जिजाऊ ब्रिगेडच्या पुणे (पूर्व) च्या जिल्हाध्यक्षा प्रा.डॉ.जयश्री गटकुळ यांनी एक पत्रक प्रसिध्दीसाठी दिले आहे. या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, उत्तरप्रदेशातील हाथरस येथील एका निष्पाप मुलीवर काही नराधमांनी सामूहिक बलात्कार करुन, मानवतेला काळिमा फासणारे अत्यंत अमानुष कृत्य केले आहे.
दिल्लीत उपचारादरम्यान त्या मुलीचा मृत्यू झाला. तिच्या आईवडिलांच्या गैरहजेरीतच पोलिसांनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले. ही अतिशय घृणास्पद घटना आहे. महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. हे प्रकार दिवसाढवळ्या घडत आहेत. महिलांचे जीवन असुरक्षित झाले आहे, असे या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.
पुणे पूर्व जिल्हा जिजाऊ ब्रिगेड या अमानवी घटनेचा जाहीर निषेध करत आहे. या प्रकरणातील आरोपींना एक महिन्याच्या आत फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी जिजाऊ ब्रिगेडची मागणी आहे, असे प्रा.डॉ.जयश्री गटकुळ यांनी प्रसिध्दी पत्रकात शेवटी म्हटले आहे.
—