Saturday, August 30, 2025
Latest:
अध्यात्मिकखेडपुणे जिल्हामहाराष्ट्रयात्राविशेषसण-उत्सव

हैबतबाबा पायरी पुजनाने आळंदीत आजपासून कार्तिकी वारीची सुरवात… यंदा माऊलींचा संजीवन समाधी सोहळा १३ डिसेंबरला…

 

महाबुलेटीन न्यूज : दिनेश कुऱ्हाडे
आळंदी : महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यादरम्यान यंदा दिनांक १० आणि ११ डिसेंबर अशा दोन एकादशी आल्याने मुख्य कार्तिकी एकादशी ११ डिसेंबर रोजी आहे. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार त्रयोदशीचा संजीवन समाधी सोहळा दि. १२ डिसेंबर ऐवजी दि. १३ डिसेंबरला साजरा होणार असल्याचे संत ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्‍वस्त अभय टिळक यांनी सांगितले.

आळंदी येथील संत ज्ञानेश्‍वर महाराज संजीवन समाधी सोहळा, कार्तिकी वारी आज पासून सुरू होत असून, पंढरपूर येथील तीन पालख्या २० वारकरी यांच्या उपस्थितीत श्रीक्षेत्र आळंदीत बसने येणार आहे.

दरम्यान, यंदा सर्वच दिनदर्शिकांमध्ये संजीवनी समाधी सोहळा दि. १२ डिसेंबर रोजी दाखविण्यात आला आहे. यंदा कार्तिकी कृष्ण पक्षात स्मार्त एकादशी व भागवत एकादशी आशा दोन एकादशी आल्याने द्वादशी व त्रयोदशी कधी साजरी करायची याबाबत संभ्रम निर्माण झाला होता, मात्र वारकरी संप्रदायात भागवत एकादशीला महत्त्व असल्याने त्यानुसार बैठक घेण्यात आली व याबाबत सविस्तर माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

असा होणार कार्तिकी सोहळा ….
◆ वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार कार्तिक कृष्ण अष्टमीला
दि.८ नोव्हेंबर रोजी वै. गुरुवर्य हैबत बाबा पायरी पूजन हैबतबाबा यांचे वंशज बाळासाहेब पवार यांच्या हस्ते विधवित पूजा करून करण्यात येणार आहे आणि संजीवन समाधी सोहळ्यास प्रारंभ होणार आहे.
दि. ११ डिसेंबर कार्तिकी एकादशीला रात्री १२ ते पहाटे २ ते ३ वाजता मुख्य पवमान अभिषेक व दुधारती होणार असून दुपारी श्रींची नगरप्रदिक्षणा होणार आहे.
दि. १२ डिसेंबरला द्वादशीला पहाटे ३ ते ४ दरम्यान खेड प्रांताधिकारी यांच्या हस्ते पंचोपचार पुजा संपन्न होणार आहे. दुपारी ४ ते ७ दरम्यान माऊलींचा रथोत्सव तसेच खिरापतीचे अभंग व मानकऱ्यांना नारळ प्रसाद व खिरापत वाटप होणार आहे.
दि.१३ डिसेंबर रोजी त्रयोदशीचा मुख्य संजीवन समाधी सोहळा साजरा होणार आहे.
दि १४ डिसेंबर संध्याकाळी श्रीं चा छबिना होऊन कार्तिकी वारी संपन्न होणार आहे.
वरील सर्व कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या नियमानुसार मर्यादित वारकर्‍यांच्या उपस्थित संपन्न होणार असल्याचे प्रमुख विश्वस्त अभय टिळक यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!