ग्रंथालये पूर्ववत सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे जिल्हा ग्रंथालय संघाने आज २४ सप्टेंबर रोजी राज्यातील सार्वजनिक ग्रंथालये पुर्ववत सुरू करण्यात यावीत, याकरिता पुणे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे यांनी हे निवेदन स्वीकारून ग्रंथालयांच्या समस्या सरकार पर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले. यावेळी पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह सोपानराव पवार, संघाचे पदाधिकारी सर्वश्री रमेशराव सुतार, राजेंद्र ढमाले, संतोष गोफणे, चंद्रशेखर कपोते, हभप. मोहन महाराज शिंदे, राजु घाटोळे आदी उपस्थित होते.