ग्रंथालयांच्या थकीत अनुदानाचा निर्णय येत्या आठ दिवसात
महाबुलेटीन नेटवर्क / विशेष प्रतिनिधी
पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याबरोबर आज ग्रंथालयाच्या समस्या व मागण्यासंदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झूम मिटींग घेण्यात आली.
यावेळी बोलताना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले की, “सन 2019-20 या वर्षातील सात जिल्ह्याचे राहिलेले चार कोटी 16 लाख 52 हजार रुपये हे प्रथमता येत्या आठ दिवसात प्राधान्याने देणार आहे. आणि उर्वरित थकित 32 कोटी 29 लाख रुपये लवकर देण्यासाठी प्रयत्न करणार असून आणि चालू वर्षाचा पहिला हप्ता कोरोणाचे संकट कमी झाल्यानंतर लवकर देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
सन 2012 पासून नवीन ग्रंथालयांना शासन मान्यता बंद आहेत, अनुदान वाढ झालेली नाही, दर्जा बदल झालेला नाही, यामध्ये नवीन धोरणानुसार शासन मान्यता देणे, दर्जा वाढ करणे, अनुदान वाढ करणे, आधी सार्वजनिक ग्रंथालया संबंधित नवीन धोरण विधिमंडळात मांडणार आहोत. यामध्ये काही धोरणात्मक अहवाल निर्णय घेतलेले आहेत.
ज्या ग्रंथालयाला 25 वर्षे, 50 वर्षे, 75 वर्षे 100 वर्षे पूर्ण झालेली आहेत. त्यांच्यासाठी काहीतरी करण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असेही यावेळी त्यांनी सांगितले.
या मीटिंगसाठी ग्रंथालय संचालनालयाचे संचालक सुभाष राठोड, राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभागाचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, रवींद्र कामत, डॉ. पवार आर. एस., प्रशांत पाटील , जितेंद्र पाटील, श्रीकांत एरुळे, अविनाश येवले, रामेश्वर पवार, समन्वयक रीताताई बाविस्कर, प्रशांत लोंढे, अक्रुरमामा सोनटक्के, सदाशिव बेडगे, सुधाकर डोंगरे, सुनील कुबल, गुलाबराव मगर, संतोष दगडगावकर, राजशेखर बालेकर आदी उपस्थित होते.
मंत्री उदय सामंत हे ग्रंथालयाच्या सर्व प्रश्नावरती सकारात्मक असून यातून लवकरच धोरणात्मक निर्णय होईल, अशी आशा आहे, असेही शेवटी प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांनी सांगितले.
आज उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या सोबत झालेल्या बैठकीत उमेशदादा, लोंढे सर, रिताताई बाविस्कर, राज्य ग्रंथालय संघाचे रामेश्वरजी पवार, गुलाबराव मगर, राजशेखर बालेकर व पदाधिकारी, कर्मचारी संघटनेचे अंकुर मामा, रवींद्र कामत, सदाशिव बेगडे व प्रतिनिधी, संचालनालयाचे संचालक सु. ही. राठोड व अधिकारी सहभागी झाले होते.