ग्रंथालय अनुदानात वाढ करणार : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांची ग्वाही
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क :
पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांनी १३ जुलै व ४ ऑगस्ट रोजी व्हीडीओ मिटींग घेतली होती. त्यावेळी संघटनेनी केलेल्या ग्रंथालयाचे अनुदान वाढ व इतर मागण्यांची हिवाळी अधिवेशनात अमंलबजावणी करावी. यासाठी महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघ पुणे विभागाचे अध्यक्ष सदाशिव बेडगे व उपाध्यक्ष धोंडीराम जेवूरकर यांनी मुंबई येथील शिवसेना संपर्क कार्यालय शिवालय येथे जावून निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली.
यावेळी ना. उदय सामंत यांनी संघटनेचे अध्यक्ष सदाशिव बेडगे यांना येत्या हिवाळी अधिवेशनात अनुदान वाढ करण्याची ग्वाही दिली. ते असेही म्हणाले की, जर पावसाळी अधिवेशन जास्त दिवस चालले असते, तर ग्रंथालय अनुदानात वाढ केली असती. हिवाळी अधिवेशनात ग्रंथालयाचे प्रश्न मार्गी लावतो. तसेच सप्टेंबरला मिळणारे ग्रंथालयाच्या पहिल्या हप्त्याचे अनुदान लवकरात लवकर वितरित करावे, अंशी विनंती केली. कारण ग्रंथालय कर्मचारी यांचे सहा महिनाचे वेतन देय असल्याचे बेडगे म्हणाले.
ना. उदय सामंत यांचा सदाशिव बेडगे यांनी शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी धोडीराम जेवूरकर उपस्थित होते, असे दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात सदाशिव बेडगे यांनी म्हटले आहे.