Friday, April 18, 2025
Latest:
दौंडपुणे जिल्हाप्रादेशिकमहाराष्ट्रविशेषसत्कार / सन्मान / पुरस्कार

पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत मिरवडी गावाचा ‘आर आर आबा स्वच्छ व सुंदर गाव’ (स्मार्ट ग्राम) पुरस्काराने गौरव

पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत मिरवडी गावाचाआर आर आबा स्वच्छ सुंदर गाव‘ (स्मार्ट ग्राम) पुरस्काराने गौरव

महाबुलेटीन न्यूज

पुणे : पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत मिरवडी ( ता. दौंड ) या गावाला  आर आर आबा स्वच्छ सुंदर गाव‘ (स्मार्ट ग्राम) पुरस्कारानेगौरविण्यात आले. जिल्हा परिषद पुणे येथे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोशारी यांच्या हस्ते पुणे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते मिरवडीचे सरपंच सागर शेलार ग्रामसेविका रेश्मा जाधव यांनी हा पुरस्कारस्वीकारला. सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र 10 लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते.

हा सन्मान विशेषतः ग्रामपंचायत कार्यकारिणी, आजीमाजी पदाधिकारी, ग्रामस्थ, कर्मचारी, आरोग्य, शिक्षण, वृक्षारोपण, स्वच्छता इतर नाविन्यपूर्ण उपक्रमातील सर्व सहभागी सहकारी यांचे यश आहे. या संपूर्ण प्रक्रियेत दौंडचे गटविकास अधिकारी श्री. येळे साहेब, विस्तार अधिकारी ताकवणे साहेब, मुलानी साहेब यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली हे यश प्राप्त झाल्याचे सरपंच सागर शेलार यांनीसांगितले.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!