गोलेगाव सोसायटीचे संचालकपदी पै. बाळासाहेब चौधरी बिनविरोध
गोलेगाव सोसायटीचे संचालकपदी पै. बाळासाहेब चौधरी बिनविरोध
महाबुलेटीन न्यूज
आळंदी / प्रतिनिधी : येथील गोलेगाव पिंपळगाव विविध विकास कार्यकारी सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक संचालक मंडळ निवडीत पुणे कुस्तीगीर संघाचे जिल्हा उपाध्यक्ष, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे प्रेणित भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन समिती खेड तालुका उपाध्यक्ष, आळंदी शहर कार्याध्यक्ष, माहिती अधिकार कार्यकर्ते पै. बाळासाहेब चौधरी ( Balasaheb Chaudhari ) यांची संचालक मंडळावर तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली. या निवडीने सलग पंधरा वर्ष बिनविरोध संचालक होण्याचा बहुमान त्यांना मिळाला आहे.
या निवडीचे खेड तालुक्यात स्वागत होत असून खेड तालुका भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन समितीचे प्रमुख तालुका संघटक सुरेशभाऊ टाकळकर यांचेसह सर्व पदाधिकारी यांनी निवडीचे स्वागत करून पै. बाळासाहेब चौधरी यांना बिनविरोध संचालक निवडी निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. गोलेगाव पिंपळगाव विविध विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक मंडळावर तीन पंचवार्षिक निवडणुकीत बिनविरोध निवड झाली. गोलेगाव पिंपळगाव विविध विकास कार्यकारी सहकारी सोसायटीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी विविध योजना पोहचविण्याचे काम यापुढील काळात केले जाईल असे निवडी नंतर त्यांनी सांगितले.
भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासचे खेड तालुका अध्यक्ष सुरेशभाऊ टाकळकर यांचे सह विविध संस्था, संघटना यांनी चौधरी यांचे अभिनंदन केले आहे.
००००